BSNL च्या 4G नेटवर्कवरून केला पहिला फोन; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

अलीकडेच सरकारने दूरसंचार क्षेत्रात 100% FDI ला मंजुरी दिली. याशिवाय दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि एजीआर देयकावर 4 वर्षांची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेत याची घोषणा करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, दूरसंचार क्षेत्राच्या स्वयंचलित मार्गात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलीय.

BSNL च्या 4G नेटवर्कवरून केला पहिला फोन; अश्विनी वैष्णव यांची घोषणा
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 9:55 PM

नवी दिल्ली : केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या 4 जी नेटवर्कवरून पहिला फोन केल्याची घोषणा केली. मंत्री म्हणाले की, हे नेटवर्क भारतातच बनवले गेलेय आणि डिझाइन केले गेलेय. पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून कॉलची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, बीएसएनएल 4 जी नेटवर्क जे भारतात बनले आहे, त्यावर पहिला कॉल केलाय.

दूरसंचार क्षेत्रात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता

अलीकडेच सरकारने दूरसंचार क्षेत्रात 100% FDI ला मंजुरी दिली. याशिवाय दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि एजीआर देयकावर 4 वर्षांची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेत याची घोषणा करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, दूरसंचार क्षेत्राच्या स्वयंचलित मार्गात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलीय.

कंपन्यांना समायोजित सकल महसूल अर्थात AGR पेमेंटवर 4 वर्षांची सवलत

मंत्रिमंडळाने एकूण 9 संरचनात्मक सुधारणांना मंजुरी दिली. याशिवाय 5 प्रक्रिया सुधारणांना मान्यता देण्यात आली. तसेच टेलिकॉम कंपन्यांना समायोजित सकल महसूल अर्थात AGR पेमेंटवर 4 वर्षांची सवलत देखील मिळेल. सर्व कर्जबाजारी दूरसंचार क्षेत्राला दिलासा देत केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचाराद्वारे स्पेक्ट्रम देयकावर स्थगिती मंजूर केली. टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि एजीआर थकबाकीवर 4 वर्षांची स्थगिती दिली जाणार आहे.

78 महिन्यांत कंपनीने 9.22 दशलक्ष मोबाईल ग्राहक गमावले

ऑगस्टमध्ये बीएसएनएलने माहितीच्या अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीमध्ये म्हटले होते की, गेल्या सुमारे 78 महिन्यांत कंपनीने 9.22 दशलक्ष मोबाईल ग्राहक गमावलेत. प्रतिसादात असे सांगण्यात आले की, जानेवारी 2015 ते मे 2021 पर्यंत मोबाईलच्या एकूण 9,22,10,990 ग्राहकांनी कनेक्शन परत केलेत. दूरसंचार नियामक TRAI ने एका अहवालात म्हटले आहे की, देशात एकूण दूरसंचार वापरकर्त्यांची संख्या 119.85 कोटी आहे. त्यात म्हटले आहे की, मे 2021 पर्यंत बीएसएनएल आणि एमटीएलचा मोबाईल फोन क्षेत्रात 10.17 टक्के बाजार हिस्सा होता, तर खासगी कंपन्यांचा वाटा 89.83 टक्के होता.

संबंधित बातम्या

डिझेल ट्रॅक्टरचे रूपांतर थेट सीएनजीमध्ये, नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

ऑक्टोबरमध्ये ‘या’ राज्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार, डीए आणि टीएमध्ये इतकी वाढ

The first phone made from BSNL’s 4G network; Announcement by Ashwini Vaishnav

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.