Gold Silver Price Today : सोन्याचा भाव वधारला, चांदीचा सूर बदलला, आजचे भाव घ्या जाणून

Gold Silver Price Today : आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. ऐन लग्नसराईत किंमतीत तेजी-मंदीचे सत्र सुरु असल्याने ग्राहकही संभ्रमात आहेत.

Gold Silver Price Today : सोन्याचा भाव वधारला, चांदीचा सूर बदलला, आजचे भाव घ्या जाणून
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 9:20 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीची आभुषणे, दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याने एकदा पुन्हा झेप घेतली आहे. सोने महागाईच्या दिशेने आगेकूच करत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात घसरण झाली होती. मंगळवारी पण घसरण झाली होती. आज, गुरुवारी सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) वाढल्या आहेत. एक तोळा सोन्यासाठी 59,820 रुपये तर एक किलो चांदीसाठी 73,000 रुपये मोजावे लागणार आहे. 19 मार्च रोजी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. चांदीच्या किंमती पण वधारल्या. येत्या काही दिवसात भावात मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

भाव वधारले

आज 30 मार्च रोजी, सकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव वधारले. गुडरिटर्ननुसार, 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झाली. आज एक तोळा सोन्याचा भाव 54, 850 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली. सकाळच्या सत्रात हा भाव 59,820 रुपये झाला. 18 मार्चपासून विचार करता सोन्यात प्रति तोळा सोन्यात चढउतार सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

एका मिस्ड कॉलवर भाव

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,730 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,,700 रुपये आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.