Rupee: रुपया धूमधडाम, दिवाळीपूर्वी पुन्हा आपटी बॉम्ब..

Rupee:रुपयाने घसरणीत पुन्हा नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. दिवाळीपूर्वी रुपया पुन्हा आपटला आहे..

Rupee: रुपया धूमधडाम, दिवाळीपूर्वी पुन्हा आपटी बॉम्ब..
घसरणीत रुपयाचा विक्रमImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 5:06 PM

नवी दिल्ली : डॉलरच्या (Dollar) तुलनेत भारतीय रुपया (Rupee) कधी मजबूत होईल हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही. पण रुपयाने घसरणीचा आणखी एक विक्रम केला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत घसरुण आता थेट 83 रुपये झाला आहे. तीन दिवसांपूर्वीच रुपया डॉलरच्या तुलनेत 82.32 रुपये होता. त्यापूर्वी तो 82.24 रुपयावर बंद झाला होता. पण त्याचा घसरणीला काही केल्या ब्रेक लागत नसल्याचे समोर आले आहे.

डॉलरपेक्षा रुपया सातत्याने घसरत असल्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अजब उत्तर दिले होते. रुपया कधी सावरेल याविषयी त्यांनी भाकित केले नव्हते, तर डॉलरविषयीचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यावर भारतीय जनमाणसातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी त्यांच्यावर तिखट हल्लाबोल केला होता.

अर्थमंत्र्यांनी रुपयाची घसरण होत नसून, डॉलर मजबूत होत असल्याचा दावा केला होता. तसेच इतर देशांच्या मानाने देशाचे चलन मजबूत असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले होते. पण चीनच्या तुलनेत भारतीय रुपयांची खालावली स्थितीविषयी कोणीही मत मांडले नाही.

हे सुद्धा वाचा

संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्रालयाने रुपयाच्या घसरणीचा इतिहास दिला आहे. त्यानुसार, 2014 मध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 63.33 रुपये होता. 2019 मध्ये रुपया 70 रुपयांपर्यंत घसरला.

30 जून 2022 रोजी एका डॉलरची किंमत 78.94 रुपया झाली. तर 11 जुलै 2022 रोजी पुन्हा रुपयात घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.41 झाला. या घसरणीला ब्रेक लावण्यात केंद्र सरकारला सपशेल अपयश आले.

16 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंत एक डॉलरची किंमत 82 रुपये 32 पैसे इतकी झाली. त्यानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया थेट 83 इतका घसरला. रुपयाचा घसरणीचा विक्रम सुरुच आहे.

22 जून ते 18 ऑक्टोबर दरम्यान रुपयापेक्षा डॉलर अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते. 22 जून रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 78.39 इतका होता. 12 जुलै रोजी तो 79.65 इतका झाला. तर 22 सप्टेंबर रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 80.79 इतका होता. आज तो थेट 83 रुपयांवर पोहचला आहे.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.