Pakistan Petrol Diesel Price : कंगाल पाकिस्तानने करुन दाखवले! डिझेल प्रति लिटर 30 रुपयांनी तर पेट्रोल इतके झाले स्वस्त

Pakistan Petrol Diesel Price : कंगाल पाकिस्तानमधील सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला. इंधन दरात मोठी कपात केली. डिझेल प्रति लिटर 30 रुपयांनी तर पेट्रोल इतक्या रुपयांनी स्वस्त झाले.

Pakistan Petrol Diesel Price : कंगाल पाकिस्तानने करुन दाखवले! डिझेल प्रति लिटर 30 रुपयांनी तर पेट्रोल इतके झाले स्वस्त
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 9:14 AM

नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तान सरकारने तिथल्या जनतेला मोठा दिलासा दिला. दुसऱ्या देशांकडून आर्थिक सहाय मिळताच, सर्वात अगोदर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीचा (Petrol-Diesel Price Cut in Pakistan) मोठा निर्णय घेतला. त्यामुळे जनतेचा आनंद गगनात मावला नाही. पाकिस्तानमध्ये पुढील पंधरवाड्यासाठी पेट्रोल 12 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमतीत 30 रुपये प्रति लिटर कपात करण्यात आली. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार (Ishaq Dar) यांनी सोमवारी या नवीन किंमतींची घोषणा केली. कालपासून नवीन दर लागू झाले आहेत. 31 मेपर्यंत हे दर लागू असतील.

आता नवीन भाव काय हायस्पीड डिझेल 30 रुपये, पेट्रोल 12 रुपये, रॉकेल 12 रुपये आणि लाईट डिझेल 12 रुपयांनी स्वस्त झाले. संशोधित किंमतींमुळे पेट्रोलची किंमत 270 रुपये प्रति लिटर, हाई स्पीड डिझेलचे भाव 258 रुपये प्रति लिटर, रॉकेलचा भाव 164.07 रुपये प्रति लिटर आणि लाईट डिझेलची किंमत 152.68 रुपये प्रति लिटर झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थव्यवस्था डबघाईला पाकिस्तानच्या डोक्यावर कर्जाचे मोठे ओझे आहे. त्याखाली पाकिस्तान पुरता गुदमरला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसतळाला गेली आहे. गेल्या वर्षभरापासून बेलआऊट पॅकेजसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडे पाकिस्तान वारंवार हात जोडत आहे. पण अद्याप याविषयीचा दिलासा मिळाला नाही. आयएमएफने (IMF) पाकिस्तानला 8 अब्ज डॉलर जमा करण्यास सांगितले आहे. थकलेले कर्ज चुकते केले तरच बेलाऊट पॅकेजवर विचार होणार आहे. या भूमिकेमुळे पाकिस्तान दुहेरी कात्रीत अडकला आहे.

पाकिस्तानमध्ये महागाई दर पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाने (Pakistan Bureau of Statistics) महागाईविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, महागाई दर उच्च पातळीवर पोहचला आहे. 1965 नंतर महागाई दर आतापर्यंतचा सर्वात महागाई दर आहे. एप्रिल महिन्यात महागाई दर वार्षिक आधारावर 36.4 टक्के होता. तर गेल्या महिन्यात हा दर 35.4 टक्के होता. दक्षिण आशियातील देशांमध्ये सर्वाधिक महागाई दर पाकिस्तानमध्येच आहे.

पेट्रोल-डिझेल का होत नाही स्वस्त भारत रशियाकडून स्वस्तात कच्चा तेल खरेदी करत आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत काहीच बदल झाला नाही. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलच्या किंमती सर्वाधिक प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. एक लिटर पेट्रोलमागे कंपन्यांना विक्रमी 17.4 रुपये आणि डिझेलमागे 27.7 रुपयांचा तोटा झाला. तेव्हा जनतेचा रोष नको म्हणून पेट्रोल-डिझेलचा भाव वाढविण्यात आला नाही. त्यावेळच्या तोट्याची भरपाई कंपन्या करुन घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतात एक वर्षांहून अधिक काळापासून इंधनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.

असा मिळतो महसूल एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.