Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | सोन्याची दरवाढीची वर्दी, काय आहेत आजचे भाव ?

Gold Silver Price Today News | सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली. एकूण 650 रुपयांची प्रति ग्रॅम वाढ झाली आहे. चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. राज्यातील मुख्य शहरात 10 ग्रॅम सोन्याने 52 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

Gold Silver Price Today News | सोन्याची दरवाढीची वर्दी, काय आहेत आजचे भाव ?
आज सोने चमकलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 1:59 PM

Gold Silver Price Today News | शुक्रवारी, 26 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव (Gold Silver Price Today News)वधरले. सोन्याच्या दरात एकूण 650 रुपयांची वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला मंगळवारपर्यंत सोन्यात 800 रुपयांची तर चांदीत 400 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता सोने-चांदीचे दर वधरले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. पण चांदीच्या दरात आज वाढ झाली नाही. दर स्थिर होते. सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond Scheme) गुंतवणूक योजना आणली आहे. या योजनेचा या वर्षातील हा दुसरा टप्पा आहे. 21 ऑगस्टपासून या योजनेत गुंतवणुकीस सुरुवात झाली आहे. 26 ऑगस्ट म्हणजे या योजनेत गुंतवणुकीचा शेवटचा दिवस आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नोव्हेंबर 2015 पासून सुवर्ण रोखे दरवर्षी जारी करते. सोन्यातील गुंतवणूक दरवर्षी 8 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे.

असे वाढले दर

बुधवारसह गुरुवारी सोन्यात प्रत्येकी 250 रुपयांनी दरवाढ झाली. शुक्रवारी ही सोने तेजीत होते. सोन्याच्या दरात एकूण 650 रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,650 रुपये झाला, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर बुधवारी 51,550 रुपये होता. गुरुवारी हाच भाव 51,820 रुपये झाला. शुक्रवारी भावात वाढ होऊन तो 51,980 रुपये झाला.बुधवारी चांदीत 100 रुपयांची वाढ झाली. गुरुवारी चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची वाढ होऊन प्रति किलो हा भाव 55,400 रुपये झाला. शुक्रवारी चांदीच्या किंमती स्थिर आहेत.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,650 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,980 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,730 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,010 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,730 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,010 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,730 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,010 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 554 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे सुद्धा वाचा

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.