AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचितशी घसरण; जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price Today News | 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,870 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,550 रुपये आहे. गेल्या 24 तासांत भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत तफावत दिसून आली आहे.

Gold Silver Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचितशी घसरण; जाणून घ्या काय आहेत आजचे दर?
सोन्याचा भाव घसरलाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 07, 2022 | 1:47 PM
Share

Gold Silver Price Today News | 7 ऑगस्ट 2022 रोजी, आज रविवारी सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) किंचित घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,870 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,550 रुपये आहे. गेल्या 24 तासांत भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत तफावत दिसून आली आहे. सोने आणि चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत राहतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) चलनाच्या किंमतीतील बदल, चलनवाढ, मध्यवर्ती बँकांमधील सोन्याचा साठा, त्यांचे व्याजदर (Interest Rate), दागिने बाजार, भौगोलिक तणाव, युद्ध आणि इतर अनेक घटकांचा परिणाम सोन्याच्या दरात चढ-उतारावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत. राज्यातील प्रमुख शहरातील सोन्या चांदीचे दर ही बदलले आहेत.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,550 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,870 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 574 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.