2000 रुपयांच्या इतक्या नोटा आल्या परत, RBI चा दावा काय
2000 Notes | काळ्या पैशांविरोधातील लढाईत गुलाबी नोटेने व्यवहार सांभाळला. पण नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षी 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1,000 रुपयांची नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर 2,000 रुपयांची नोटी व्यवहारात सादर करण्यात आली होती.
नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 1 डिसेंबर रोजी देशभरातून 97.26 टक्के 2000 रुपयांच्या नोटा माघारी आल्याचे जाहीर केले. आरबीआयने यावर्षी 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा परत बोलावल्या होत्या. नोटबंदीच्या काळात या गुलाबी नोटांनी व्यवहार सांभाळला. पण या नोटा काही काळासाठीच असतील अशी दोन वर्षापूर्वी रंगली होती. त्यानंतर या नोटा हळूहळू बाजारातून गायब झाल्या. त्या एटीएममधून पण बाहेर पडणे मुश्कील झाल्यावर रोखीत सुद्धा त्यांचे प्रमाण कमी झाले होते. या नोटा बदलण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली. आजही आरबीआयच्या देशातील विभागीय कार्यालयात या नोटा बदलण्याचे काम सुरुच आहे.
नोटेची वैधता कायम
मुदत संपल्यानंतर या नोटा वैध असतील. त्यांची वैधता संपणार नाही, पण त्या चलनात स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यांचे चलनातील अस्तित्व राहणार नाही. व्यवहारात त्यांचा वापर होणार नाही. पण बँका आणि आरबीआय यांच्यादरम्यान त्या वापरल्या जातील. या नोटांची पण साठेबाजी होत असल्याची शंका केंद्र सरकारला होती. आता भारतात 500 रुपयांची नोट सर्वाधिक मूल्य असलेले चलन आहे.
2 टक्के नोटा बाजारात
आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपये मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा (2000 rupee note) माघारी बोलावल्या होत्या. यापूर्वी 93 टक्के नोटा परत आल्याची माहिती देण्यात आली होती. 31 जुलैपर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या 88 टक्के नोटा बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलण्याची मुदत देण्यात आली होती. ती पुढे 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 97.26 टक्के नोटा जमा झाल्या आहेत.
या 19 शहरांमध्ये बदलता येतील 2000 च्या नोटा
आरबीआयच्या या 19 शहरांमधील विभागीय कार्यालयात दोन हजारांची नोट बदलता येईल. तुम्ही थेट या कार्यालयात जाऊन नोटा बदलवून घेऊ शकता. नाही तर भारतीय टपाल खात्याकडून या नोटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता.
अहमदाबाद
बेंगळुरु
बेलापूर
भोपाळ
भुवनेश्वर
चंदीगड
चेन्नई
गोवाहाटी
हैदराबाद
जयपूर
जम्मू
कानपूर
कोलकत्ता
लखनऊ
मुंबई
नवी दिल्ली
पाटणा
तिरुअनंतपूरम