Mukesh Ambani Cook Salary : मुकेश अंबानी यांच्या कुकचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की

Mukesh Ambani Cook Salary : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या स्वयंपाक्याला किती पगार देण्यात येतो, माहिती आहे का? अंबानी यांच्या ड्रायव्हरला देण्यात येणारे वेतन तर जगजाहीर झाले आहे.

Mukesh Ambani Cook Salary : मुकेश अंबानी यांच्या कुकचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 4:44 PM

नवी दिल्ली : जगातील अव्वल श्रीमंतात भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे नाव आहे. ते जगातील टॉप-12 मधील एक श्रीमंत आहेत. प्रचंड दौलत असताना त्यांचे पाय जमिनीवर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मुकेश अंबानी हे शाकाहारी आहेत. त्यांना शाकाहारी भोजन आवडते. ते अमेरिकेत असल्यापासून त्यांचे शाकाहार, उत्तम आहार, हेच धोरण आहे. 1970 च्या दशकात ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात शिक्षण घेत होते. तेव्हापासून ते शाकाहारावर भर देतात. त्यांना अंडे ही आवडते. पण कोणत्याही प्रकारचे मास, मद्यापासून ते चार हात दूर आहेत. मुंबईतील ॲंटिलिया या आलिशान घरात त्यांचे मोठे किचन आहे. त्यात खानसामा, स्वयंपाकी इतर नोकर चाकर आहेत. त्यांच्या शेफचा (Chef) पगार किती आहे, माहिती आहे का?

मुकेश अंबानी यांना सात्विक, साधं जेवण आवडते. त्यांना वरण, पोळी आणि भात आवडतो. ते इतर ठिकाणी जेवण करत नाही. त्यांना घरचेच जेवण आवडते. इतर ठिकाणी बिझनेस डील करताना इतर पदार्थांचा अस्वाद घेतात. पण घराच्याच जेवणावर त्यांचा भर आहे. सर्वसामान्य व्यक्तीसारखंच त्यांना साधं जेवण आवडतं. त्यांना चमचमीत अथवा अति मसालेदार पदार्थ आवडत नाहीत. संपत्ती पायाशी लोळण घेत असताना ही जेवणावर आणि जिभेवर त्यांचा ताबा आहे.

भारतीय जेवणासोबतच मुकेश अंबानी यांना थाई पदार्थही खूप आवडीचे (Mukesh Ambani Favorite Food)आहे. रविवारच्या नाष्ट्यात त्यांच्याकडे इडली-सांभार हा दक्षिणेतील लोकप्रिय खाद्य पदार्थ असतो. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत याविषयीची माहिती दिली होती. दिवसभरात कितीही काम असेल, बैठकांचं सत्र असले तरी एकवेळचे जेवण कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रपणे करतात.

हे सुद्धा वाचा

दैनंदिन जीवनात भोजन हा एक आवश्यक घटक असल्याने शेफला ही ॲंटिलियात विशेष स्थान आहे. उदरभरण नोव्हे जाणिजे पुण्यकर्म, असा मामला असल्याने या शेफला भारीभक्कम पगार देण्यात येतो. तो जिव्हेची पोटाची काळजी घेत असल्याने त्याची काळजी अंबानी कुटुंबिया घेतात. तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या शेफला, स्वयंपाक्याला किती पगार मिळतो ते, एका अंदाजानुसार, आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यापेक्षाही त्याचा पगार जास्त आहे.

कर्मचाऱ्याला आर्थिक चिंता नसावी, असे अंबानी यांचे धोरण आहे. त्यामुळे अनेक चांगल्या पदावरील व्यक्तींना जास्त पगार आणि सोयी-सुविधा देण्यात येतात. मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरला 2 लाख रुपये मासिक वेतन मिळते. म्हणजे 24 लाख रुपये वार्षिक पगार देण्यात येतो. 2017 मध्ये याविषयीचा खुलासा झाला होता. आता हा पगार किती असेल, याचा अंदाज बांधता येतो.

मीडिया रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबियांच्या शेफला ही जोरदार पगार मिळतो. एका दाव्यानुसार, या शेफला दर महिन्याला 2 लाख रुपये मासिक वेतन मिळते. म्हणजे 24 लाख रुपये वार्षिक पगार देण्यात येतो. तसेच इतर सोयी-सवलती देण्यात येतात. त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे संरक्षण आणि इतर सवलती पण मिळतात. मुकेश अंबानी यांच्या काही कर्मचाऱ्यांची मुले तर परदेशातील मोठ्या शाळा, महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.