Share Market : शेअर बाजाराचा झंझावात, पुन्हा नवीन रेकॉर्ड, गुंतणूकदार मालामाल

Share Market : शेअर बाजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली. शेअर बाजाराच्या या मुसंडीने भारतीय गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य संचारले आहे. त्यांच्यात सत्तर हत्तीचे बळ आले आहे. गेल्या महिन्याभरात शेअर बाजाराने नवनवीन रेकॉर्ड केले आहेत.

Share Market : शेअर बाजाराचा झंझावात, पुन्हा नवीन रेकॉर्ड, गुंतणूकदार मालामाल
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 4:21 PM

नवी दिल्ली : शेअर बाजाराने नवीन रेकॉर्ड (Share Market New Record) नावावर केला. बाजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली. शेअर बाजाराच्या या मुसंडीने भारतीय गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य संचारले आहे. त्यांच्यात सत्तर हत्तीचे बळ आले आहे. गेल्या महिन्याभरात शेअर बाजाराने नवनवीन रेकॉर्ड केले आहेत. सुरुवातीलाच शेअर बाजाराने आक्रमक खेळी खेळली. सेन्सेक्स आज बाजार उघडताच जवळपास 250 अंकांनी वधारला. तर निफ्टीतही तेजी दिसून आली. निफ्टी 50 जवळपास 60 अंकांनी वधारला. निफ्टी 19383 अंकावर व्यापार करत होता. दोन्ही निर्देशांकानी भरारी घेतल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. सेन्सेक्समधील 30 पैकी 9 कंपन्यांना आगेकूच करता आली नाही. भारती एअरटेल, रिलायन्स, एनटीपीसी आणि टाटा स्टीलला कामगिरी बजावता आली नाही.

सोमवारी पण रेकॉर्ड सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी बंद होताना नवीन रेकॉर्ड केला. यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. दोन्ही निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर पोहचले. सेन्सेक्सने पहिल्यांदा 65,000 हजाराचा आकडा पार केला. तर निफ्टीने 19,300 अंकांचा टप्पा ओलांडला. मार्केटमधील तेजीचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. व्यापारी सत्र बंद होताना सेन्सेक्स 486 अंकांच्या वृद्धीसह 65,205 अंकावर तर निफ्टीत 133 अंकांची उसळी आली. निफ्टी 19,322 अंकावर पोहचला.

गेल्या आठवड्यात दिसली तेजी शेअर बाजारात तेजीचे सत्र सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी, गेल्या आठवड्यात BSE मधील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 296.48 लाख कोटी रुपयांवर पोहचले. हे आतापर्यंतचा सर्वकालीन उच्च स्तर आहे. बीएसई सलग तीन दिवसांत जोरदार मुसंडीसह बंद झाला. हा निर्देशांक 803.14 अंकांनी म्हणजे 1.26 टक्के उसळीसह उच्चांकी 64,718.56 अंकावर पोहचला. तीन व्यापारी सत्रात बीएसई सूचकांक एकूण 1,748.56 अंकांनी म्हणजे 2.77 अंक चढला.

हे सुद्धा वाचा

बाजारातील भांडवलात वृद्धी सातत्याने तेजीचे सत्र सुरु असल्याने बीएसई मधील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील भांडवल पहिल्यांदाच 296 लाख कोटींच्या पुढे गेले.तीन व्यापारी सत्रात गुंतवणूकदारांची संपत्ती 5,80,740.05 कोटी रुपयांनी वधारली. यापूर्वी 21 जून रोजी बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील भांडवल 294.36 लाखांवर पोहचले होते.

भरवसा वाढला भारतीय शेअर बाजारावर गुंतवणूकदारांचा भरवसा वाढला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पुन्हा भारतीय बाजाराकडे कूच केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन दौऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसताच, बाजारात तेजीचे सत्र सुरु झाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला लवकरच मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे.

या दिवशी बाजार राहणार बंद

  • 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन
  • 19 सप्टेंबर, गणेश चतुर्थी
  • 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती
  • 24 ऑक्टोबर, दसरा
  • 14 नोव्हेंबर, दिवळी, बळी प्रतिपदा
  • 27 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती
  • 25 डिसेंबर, नाताळ, ख्रिसमस

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.