Reliance Campa : बाजारात ‘शीत’ युद्ध! आता चाखा प्रसिद्ध कॅम्पाची चव, 40 वर्षांपूर्वी भारतीयांना लावले होते वेड
Reliance Campa : आता 70-80 च्या दशकातील सॉफ्ट ड्रिंकची चव आता नव्याने तुम्ही चाखू शकता. 40 वर्षांपूर्वी भारतीयांना वेड लावणारा हा ब्रँड पुन्हा बाजारात उतरला आहे. रिलायन्स हा ब्रँड घेऊन मैदानात उतरला आहे.
नवी दिल्ली : आता 70-80 च्या दशकातील सॉफ्ट ड्रिंकची चव आता नव्याने तुम्ही चाखू शकता. 40 वर्षांपूर्वी भारतीयांना वेड लावणारा हा ब्रँड पुन्हा बाजारात उतरला आहे. रिलायन्स हा ब्रँड घेऊन मैदानात उतरला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या (Reliance Retail Ventures) एफएमसीजी ( FMCG) कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने (Reliance Consumer Products Limited) सॉफ्ट ड्रींक ब्रँड कॅम्पा (Campa) लाँच केला आहे. रिलायन्स रिटेलने सुरुवातीला कॅम्पा पोर्टफोलिओत तीन खास फ्लेवर लाँच केले आहे. यामध्ये कॅम्पा कोला (Campa Cola), कॅम्पा लेमन (Campa Lemon) आणि कॅम्पा ऑरेंज ( Campa Orange) यांचा समावेश आहे. कॅम्पा बाजारातील पेप्सी ( Pepsi) आणि कोका-कोला ( Coca Cola) या ब्रँडला टफ फाईट देईल. त्यामुळे बाजारात आता शीत युद्ध रंगणार आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये रिलायन्स रिटेलने एफएमसीजी व्यवसायाला पंख दिले आहेत. त्यातूनच सॉफ्ट ड्रींक ब्रँड कॅम्पाची ( Campa) खरेदी केली. कंपनीने कॅम्पासोबत सोसयो ( Sosyo) हा ब्रँड प्युअर ड्रींक समूहाकडून खरेदी केला आहे. रिलायन्स रिटेलने कॅम्पा ब्रँडचे अधिग्रहण केले. खरेदीच्या सहा महिन्यानंतरच रिलायन्सने हा ब्रँड बाजारात उतरवला. 70-80 च्या दशकातील या सॉफ्ट ड्रिंकने भारतातील तरुणाईला वेड लावले होते. पण 90 च्या दशकात कोका-कोला आणि पेप्सीच्या आव्हान कंपनीला मोडता आले नाही.
रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेडने कॅम्पा ब्रँड खरेदी करुन तो पुन्हा लाँच केला. भारतीय ब्रँडला पुन्हा सक्रिय करुन लोकांना देशी ब्रँडची चव चाखायला लावणे हा कंपनीचा प्रमुख उद्देश आहे. या ब्रँडशी लोकांची एकेकाळी नाळ जोडल्या गेली होती. भारतीय ग्राहकांवर या ब्रँडने त्याकाळी अमिट छाप सोडली होती. आता तोच ब्रँड पुन्हा मैदानात आल्याने हा ब्रँड मार्केट गाजवले, असा विश्वास कंपनीला वाटतो.
रिलायन्सने दिल्लीस्थित प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून (Pure Drinks Group) कॅम्पा (Campa) ब्रँड खरेदी केला आहे. त्यासाठी रिलायन्सने सुमारे 22 कोटी रुपये मोजले आहेत. ईटीने याविषयीचा दाखला एका अहवालाआधारे दिला आहे. ऑक्टोबरपर्यंत कंपनी सॉफ्ट ड्रिंक बाजारात उतरल्यास तिची पेप्सी (Pepsi) आणि कोका (Coca Cola) कोला या कंपन्यांशी थेट स्पर्धा होईल.
कॅम्पा अनेक फ्लेवर्समध्ये बाजारात दाखल होत आहे. त्यामध्ये आयकॉनिक कोला, लेमन आणि ऑरेंज फ्लेवर्सचा समावेश असेल. रिलायन्स रिटेल स्टोअर्स , जिओमार्ट आणि रिलायन्सकडून प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये हे उत्पादन खरेदीसाठी उपलब्ध असेल. त्याला ग्राहक कसा प्रतिसाद देतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.