कमाईत या महिलेने मुकेश अंबानी यांना टाकले मागे, श्रीमंतांच्या यादीत पुढे

Richest Woman | भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत दोन क्रमांकांनी घसरले. त्यांना मेक्सिको देशातील कार्लोस स्लिम आणि या सर्वात श्रीमंत महिलेने मागे ढकलले आहे. ही महिला श्रीमंतांच्या यादीत पुढे आली आहे. या महिलेकडे इतकी संपत्ती आहे. तर तिचा हा ब्रँड जगभर विक्री होतो.

कमाईत या महिलेने मुकेश अंबानी यांना टाकले मागे, श्रीमंतांच्या यादीत पुढे
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 5:48 PM

नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत खाली घसरले आहे. ते 11व्या स्थानावरुन 13 व्या क्रमांकावर फेकले गेले. मेक्सिकोच्या कार्लोस स्लिम आणि फ्रान्सच्या फ्रांसुआ बेटनकॉट मायज (Francoise Bettencourt Meyers) या दोघांनी आघाडी घेतली आहे. मायज या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. 2021 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांनी टॉप 10 मध्ये नाव कोरले आहे.  आता त्यांनी आगेकूच सुरु केली आहे. अजून टॉप टेनमध्ये त्या दाखल झाल्या नाहीत. पण अशीच कामगिरी राहिली तर पुन्हा हा रेकॉर्ड त्या नावावर करु शकतात.  कोण आहेत फ्रांसुआ बेटनकॉट मायज आणि काय आहे त्यांचा व्यवसाय?

या लोकप्रिय ब्रँडच्या प्रमख

फ्रांसुआ बेटनकॉट मायज या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या एक व्यावसायिक, उद्योजक तर आहेतच पण त्या फिलेंथ्रॉपिस्ट आणि लेखक पण आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा कॉस्मेटिक्स ब्रँड L’Oreal वारशातून मिळाला आहे. या ब्रँडमध्ये त्यांची एक तृतीयांश हिस्सेदारी आहे. त्या या कंपनीच्या प्रमुख आहेत. L’Oreal कडे Lancome आणि Garnier असे ब्रँड आहेत. 2022 मध्ये या कंपनीचा महसूल 41.9 अब्ज डॉलर होता.

हे सुद्धा वाचा

इतकी आहे संपत्ती

Bloomberg Billionaires Index नुसार, 70 वर्षांच्या मयाज यांची एकूण संपत्ती 86.8 अब्ज डॉलर इतकी आहे. त्या जगातील श्रीमंतांच्या यादीत आता 12 व्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांची एकूण नेटवर्थ 15.3 अब्ज डॉलरने वाढली.L’Oreal मध्ये त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाकडे 33 टक्के वाटा आहे. L’Oreal च्या शेअरची किंमतीत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे.

आई-आजोबांनी उभी केली कंपनी

मयाज यांना ही श्रीमंती आई-आजोबांकडून मिळाली आहे. त्यांची आई Liliane Bettencourt आहे. त्यांचे वडील Eugene Schueller हे आहेत. त्यांनी L’Oréal या ब्रँडची सुरुवात केली होती. मायज या 1997 पासून L’Oreal च्या बोर्डावर आहेत. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांचे आईचा मृत्यू झाला. सध्या त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.