Today Gold Silver Price : सोने-चांदीत पडझड, 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय
Today Gold Silver Price : सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमजोर झाल्याने सोने-चांदीच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. 24 कॅरेट सोन्याच्या भावात 270 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे.
नवी दिल्ली : 2 फेब्रुवारीनंतर सोन्याने आस्ते कदम धोरण स्वीकारले आहे. सोन्याच्या किंमती (Gold Price) भरारी घेतली असे वाटत असताना आता 20 दिवसानंतरही सोन्याला ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) कडक धोरण घेतल्याने डॉलर मध्यंतरी वधारला होता. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. आता डॉलर (Dollar) तर कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वायदे बाजारातही (MCX) सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांची घसरण झाली. आज या सोन्याचा भाव 51,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने काल 56,880 रुपये होते. त्यात 270 रुपयांची घसरण झाली आहे. हा भाव 56,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार होत आहे. सोन्याच्या किंमतींना सध्या ब्रेक लागला आहे. 2 फेब्रुवारीनंतर गेल्या 20 दिवसांत सोन्याचे आवसान गळाले आहे. सोन्यात तेजी येईल, पण सध्या स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) किलोमागे 500 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा आजचा भाव 68,300 रुपये प्रति किलो झाला आहे.
15 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 69,950 रुपये किलो होता. त्यानंतर चार दिवस या किंमतीत तब्बल 1400 रुपये प्रति किलोची घसरण झाली. 22 फेब्रुवारी रोजी भावात 300 रुपयांची वाढ झाली. आता भावात 500 रुपयांची घसरण झाली आहे. 24 फेब्रुवारी रोजी चांदी 68,300 रुपये प्रति किलो आहे.
24 कॅरेट सोने आज 416 रुपयांनी स्वस्त झाले, त्याचा भाव 56080 रुपये, 23 कॅरेटचे सोने 415 रुपयांनी स्वस्त झाले, त्याचा भाव 55,855 रुपये, 22 कॅरेटचे सोने 318 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचा भाव 51369 रुपये, 18 कॅरेट सोने 312 रुपयांनी उतरुन 42060 रुपये झाले आणि 14 कॅरेटचे सोने 243 रुपयांनी घसरुन 32807 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे.
सोने सध्या त्याचा सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा 2800 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी तिच्या उच्चांकी किंमतीपेक्षा 14800 रुपये प्रति किलोने स्वस्त मिळत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो होता.
गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे.
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.