7th Pay Commission : दुप्पट आनंद! केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणरा हर्षवायू, 31 मे रोजी येणार आनंदवार्ता
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 31 मे रोजी संध्याकाळी मोठी घोषणा होऊ शकते. त्यांच्या महागाई भत्त्याविषयी त्यांना गोड बातमी मिळू शकते.
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 31 मे रोजी संध्याकाळी मोठी घोषणा होऊ शकते. महागाई भत्याची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे. डीए वाढीविषयी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. देशातील विविध संस्था त्यांचा वृद्धी दर जाहीर करतात. 31 मे रोजी AICPI निर्देशांक जाहीर होऊ शकतो. त्याआधारे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित होईल. जुलै महिन्यात महागाई भत्त्यात किती वाढ करण्यात येईल, याचे चित्र या आकडेवारीवरुन समोर येईल. महागाई भत्ता (DA Hike) 42 टक्के आहे. जानेवारीपासून तो लागू करण्यात आला आहे. महागाई भत्त्यासाठी 3 महिन्यांचे आकडे हाती येतील आणि चित्र स्पष्ट होईल.
4 टक्के वाढ मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा निर्णय झाला. पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी 2023 पासून तो लागू करण्यात आला. जुलै 2023 मध्ये महागाई भत्ता जाहीर करण्यात येईल. AICPI निर्देशांक हे गणित अवलंबून आहे. यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा निर्णय होऊ शकतो.
AICPI निर्देशांक म्हणजे काय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनवेळा महागाई भत्ता देण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येते.
AICPI-IW मध्ये चढउतार कामगार आयोगाने तीन महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांची AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, जानेवारीत या निर्देशांकात तेजी होती. फेब्रुवारी महिन्यात त्यात घसरण झाली. मात्र, मार्चमध्ये पुन्हा एकदा निर्देशांकाने उसळी घेतली. निर्देशांक 132.7 अंकांवरून 133.3 अंकांवर पोहोचला आहे. एकूण 0.6 अंकांची वाढ झाली. महिन्याच्या आधारावर निर्देशांकाने 0.45 टक्क्यांची उसळी घेतली. जानेवारीत 43.08 टक्के, फेब्रुवारीत 43.79 टक्के आणि मार्चमध्ये 44.46 टक्के महागाई भत्ता मिळाला होता. आता एप्रिलमध्ये त्यात किती वाढ होईल, हे 31 मे रोजी जाहीर होणार आहे.
वर्षांतून दोनदा होते वाढ दुसऱ्या सहामहीसाठी डीएमध्ये वाढीचा प्रस्ताव सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येऊन केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करते. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, वर्षांतून दोन वेळा डीएमध्ये वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई दरानुसार केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करते.