हे 10 देश नागरिकांकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाहीत, तरीही याची इकॉनॉमी आहे सुसाट

नुकता आपल्या भारताचा अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला आहे. या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला आयकरातून किंचितसा दिलासा मिळाला आहे. परंतू जगात काही असेही देश आहेत जेथे नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही.

हे 10 देश नागरिकांकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाहीत, तरीही याची इकॉनॉमी आहे सुसाट
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 10:28 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमन ( Nirmala Sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्वाधिक चर्चा करासंदर्भात झाली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून सरकारला उत्पन्न मिळत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात एंजल टॅक्स हटविण्यात आला आहे. त्यामुळे स्टार्टअप्सना फायदा होणार आहे. आता अर्थव्यवस्थेवर या कर प्रणालीचा मोठा प्रभाव पडला आहे. परंतू जगात काही देश असेही  आहेत जे आपल्या नागरिकांकडून एक पैसाही कर वसुल करीत नाही. तरी या देशाची इकॉनॉमी सुसाट धावत आहे. चला तर असे दहा देश पाहूयात….

यूनायटेड अरब अमीरात ( UAE )

या यादीत सर्वात आधी नाव नाम यूनायटेड अरब अमीरात या देशाचे येते. या देशाने वैयक्तिक कर लागू केलेला नाही. सरकार संपूर्णपणे वॅट (VAT) सारख्या अप्रत्यक्ष ( इनडायरेक्ट टॅक्स ) वसुल केला जातो.ऑईल आणि टूरिझमच्या यूएईची इकॉनॉमी खूपच मजबूत आहे. कारण हा देश तेल संपन्न देश आहे.तसेच पर्यटनामुळेही या देशाची तिजोरी भरलेली असते.

बहारीन (Bahrain)

बहारीनचे सरकार देखील आपल्या नागरिकांकडून आयकर वसुल करीत नाही. येथेही दुबईसारखीच व्यवस्था आहे. सरकार इनडायरेक्ट टॅक्सने आपला खर्च भागवते. या सिस्टममुळे बहारीन मध्ये छोटे बिजनेस आणि स्टार्टअप्स वेगाने वाढत आहेत. आणि इकॉनॉमी चांगली आहे.

कुवैत (Kuwait)

कुवैत देखील एक टॅक्स फ्री देश आहे. या देशातील जनतेला देखील इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. कुवैतची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे कुवैत सरकारला लोकांकडून आयकर वसुल करण्याची काही आवश्यकता राहात नाही.

सौदी अरब (Saudi Arabia)

सौदी अरबने आपल्या नागरिकांना इन्कम टॅक्स आणि् डायरेक्ट टॅक्स मधून मुक्त केलेले आहे. देशाची इकॉनॉमी इनडायरेक्ट टॅक्स सिस्टममुळे वेगाने दौडत आहे.

द बहामस ( The Bahamas )

बहामासची अर्थव्यवस्था टूरिझमवर अवलंबून आहे. या देशाने देखील आपल्या नागरिकांना इन्कम टॅक्सपासून मुक्त केले आहे. दरवर्षी येथे लोक फिरायला येतात. त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था चालते.

ब्रूनई (Brunei)

या इस्लामिक देशात तेलाच भांडार आहेत. येथील सरकार लोकांकडून कोणताही टॅक्स घेणे गरजेची समजत नाही.

केमन आयलँड (Cayman Islands)

उत्तर अमेरिकेतील हा देश टूरिझमसाठी ओळखला जात असून या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावरच चालते. लोक येथे पर्यटनासाठी येत असतात. हा देश सुट्ट्या घालविण्यासाठी उत्तम आहे. या देशाचे सरकार आपल्या जनतेकडून इन्कम टॅक्स वसूल करीत नाही.

ओमान (Oman)

ओमान देखील बहारीन आणि कुवैत सारखाच आपल्या नागरिकांकडून कोणताही प्रत्यक्ष कर वसुल करीत नाही. हा देश तेल आणि गॅस विकून आपली इकॉनॉमी व्यवस्थितरित्या चालवित आहे.

कतार (Qatar)

कतार देश देखील आपल्या शेजारील आखाती देशांसारखा ऑईल इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. यामुळे कतारमध्ये जनतेकडून इन्कम टॅक्स वसूल केला जात नाही. हा देश छोटा असूनही एक श्रीमंत देश आहे.

मोनाको (Monaco)

मोनाको हा देश यूरोपमधील एक छोटासा देश है. या छोट्याशा देशाची इकॉनॉमी खूप मजबूत आहे.हा देश टूरिझममधूनच कमाई करीत असतो. त्यामुळे या देशाला जनतेकडून इन्कम टॅक्स घेण्याची गरज नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.