Share Market | शेअर बाजारातील दिग्गजांना धोबीपछाड! पण तुम्हाला कमाईची अफलातून संधी

Share Market Quality Stocks News | रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यात अनेक कंपन्यांना नुकसान झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शेअरवरही झाला. शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 38 टक्क्यांनी घसरले आहेत.

Share Market | शेअर बाजारातील दिग्गजांना धोबीपछाड! पण तुम्हाला कमाईची अफलातून संधी
पडत्या काळात गुंतवणूक, फायद्याची खेळीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 7:23 PM

Giant Stocks News | रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia ukraine Crisis) गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ लोटले तर सुरुच आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कमालीची अस्वस्थता आहे. त्यातच मित्र राष्ट्रांनी रशियाला धड शिकवण्यासाठी निर्बंधांचा (restrictions) धडाकाच लावला आहे. त्याचा जागतिक व्यापारासोबतच अनेक कंपन्यांच्या उत्पादन विक्रीवर ही परिणाम झाला आहे. यामध्ये काही भारतीय कंपन्यांचे ही नुकसान होत आहे. या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. घसरणीचा फटका या कंपन्यांच्या स्टॉकलाही बसला आहे. शेअर बाजारात (Share Market) जे स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले ते आता 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आले आहेत. हे स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 38% खाली आले आहेत. हे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या अगदी जवळ आहेत. ही कमाईची एक संधी आहे. या शेअरमध्ये आता केलेली गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याविषयीचा अभ्यास आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या शेअर्समधील गुंतवणूक तुम्हाला मालामाल करू शकते.

बजाज फिनसर्व्ह | हा मिड कॅप स्टॉक शुक्रवारी 11,831 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. जो 19,325 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 38 टक्क्यांनी घसरला आहे. या समभागाचा 52 आठवड्यांचा नीचांक 10,727 रुपये प्रति शेअर आहे. याचा अर्थ असा की स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा 10% वर व्यापार करत आहे. बुधवारी 20 जुलै रोजी हा स्टॉक 12,382.85 रुपयांवर व्यापर करत होता. हा स्टॉक लंबी रेस का घोडा म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे गुंतवणुकदारांना या स्टॉकमधील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.

हे सुद्धा वाचा

HDFC बँक | शुक्रवारी HDFC बँकेचा शेअर 1364 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या समभागाचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1725 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1271.60 रुपये आहे. याचा अर्थ स्टॉक त्याच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकावरून 21% खाली व्यापार करत आहे. बुधवारी 20 जुलै रोजी हा स्टॉक 1,363.55 रुपयांवर व्यापर करत होता. सध्या हा स्टॉक 52-आठवड्यांच्या नीचांकीपेक्षा फक्त 7% वर आहे.

अॅक्सिस बँक | गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी कंपनीचा शेअर 662.50 रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता. कंपनीच्या समभागात 52 आठवड्यांचा उच्चांक 866.90 होता. त्याच वेळी, किमान पातळी 618.25 रुपये होती. म्हणजेच, स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी वरून 7% वर व्यापार करत आहे. बुधवारी 20 जुलै रोजी हा स्टॉक 3.35 टक्क्यांच्या उसळीसह 703.95 रुपयांवर व्यापार करत होता.

डॉ. रेड्डी लॅब | या फार्मा स्टॉकच्या शेअरची किंमत 4532.55 रुपयांच्या पातळीवर आली आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5447 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची किमान पातळी 3654 रुपये आहे. म्हणजेच, स्टॉक सध्या 52 आठवड्यांच्या नीचांकी वरून 24% वर व्यापार करत आहे. बुधवारी 20 जुलै रोजी हा स्टॉक 2.75% च्या घसरणीसह 4445.15 रुपयांवर व्यापार करत होता.

एशियन पेंट्स | NSE मध्ये शुक्रवारी कंपनीच्या शेअरची किंमत 2978.40 रुपयांपर्यंत खाली आली होती. स्टॉक 52-आठवड्याच्या उच्च पातळीच्या खाली 17% आणि 52-आठवड्याच्या नीचांकी पेक्षा 15% वर व्यापार करत आहे. कंपनीने वर्षभरात एक टक्काही परतावा दिलेला नाही.बुधवारी 20 जुलै रोजी हा स्टॉक 3002 रुपयांवर व्यापार करत होता.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.