फेब्रुवारी 1 पासून व्यवहारातील या 5 गोष्टी बदलणार, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम
अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल.
नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2021 पासून आपल्या दैनंदिन व्यवहारात मोठे बदल होणार आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2020) सादर केला जाणार आहे. त्यामुळे या वर्षी काय महागणार आणि काय स्वस्त होणार हे आपल्याला 1 तारखेला समजेल. अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. (These 5 things will change from February 1 the effect will be directly on your pocket)
1. 1 फेब्रुवारीला बदलतील सिलिंडरच्या किंमती
लक्षात असूद्या तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर आणि कमर्शियल सिलिंडरच्या किंमती ठरवतात. त्यामुळे 1 फेब्रुवारीला सिलिंडरची किंमती बदलल्या जातील.
2. ‘या’ एटीएममधून तुम्ही पैसे काढू शकणार नाही
पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ग्राहकांनासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, 1 फेब्रुवारीपासून पीएनबी एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल तर 1 फेब्रुवारीपासून ईएमव्ही (EMV) नसलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार नाहीत.
3. सुरू होणार आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स
एअर इंडिया एक्सप्रेसने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस फेब्रुवारी ते 27 मार्च 2021 दरम्यान त्रिची आणि सिंगापूर दरम्यान दररोज फ्लाईट्स सुरू असतील.
4. ‘या’ वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता…
मोदी सरकार 1 फेब्रुवारी 2021 ला आपलं बजेट सादर करणार आहे. यामध्ये फर्निचरचा कच्चा माल, तांबे, काही रसायनं, दूरसंचार उपकरणं, रबर उत्पादनं, पॉलिश हिरे, रबर वस्तू, चामड्याचे कपडे यासह अनेक वस्तूंवर सरकार कस्टम ड्युटी कमी करण्याची शक्यता आहे.
5. PMC Bank देणार ऑफर
पीएमसी बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना ऑफर देण्याची अंतिम मुदत दिली आहे. Centrum Group-BharatPe यासारख्या काही गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे ऑफर केली आहे. याशिवाय यूके कंपनी लिबर्टी ग्रुपनेही त्यांची ऑफर सादर केली आहे. (These 5 things will change from February 1 the effect will be directly on your pocket)
संबंधित बातम्या –
अरे देवा! बिटकॉइनच्या रुपात या व्यक्तीकडे आहेत 1800 कोटी, पण विसरला पासवर्ड
नवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट
th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
(These 5 things will change from February 1 the effect will be directly on your pocket)