Share Market : दलाल स्ट्रीटचे हे आहेत महारथी! मिनिटात करतात कोट्यवधींची कमाई

Share Market : 1.59 लाख कोटी रुपयांच्या पोर्टपोलिओसह राधाकृष्ण दमानी टॉप-10 मध्ये सर्वात आघाडीवर आहेत. त्यानंतर झुनझुनवाला यांचे कुटुंब आहे. या गुंतवणूकदारांकडे एकूण 2.3 लाख कोटी रुपयांचे शेअर आहे. बीएसईच्या एकूण मार्केट कॅम्पमध्ये हा वाटा 0.7 टक्के इतका आहे.

Share Market : दलाल स्ट्रीटचे हे आहेत महारथी! मिनिटात करतात कोट्यवधींची कमाई
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 4:50 PM

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) आकड्यांनुसार, जवळपास 14 कोटी गुंतवणूकदारांनी उलाढाल केली. देशातील एकूण लोकसंख्येपैकी काही गुंतवणूकदार बाजारात नियमीत गुंतवणूक करतात. या गुंतवणूकदारांपैकी काही मास्टर आहेत. त्यांना शेअर बाजारातील (Share Market) शार्क म्हटले जाते. त्यांना बाजारातील महारथी, धुरंधर अशी बिरुदावली जोडली जाते. त्यांचा पोर्टफोलिओ काही कोटी रुपयांचा नाही तर हजारो कोटींचा आहे. यामध्ये डीमार्टचे राधाकिशन दमानी यांचा क्रमांक सर्वात अगोदर येतो. त्यांच्यानंतर राकेश झुनझुनवाला यांचे कुटुंब, हेमेंद्र कोठारी, आकाश भंसाली, मुकुल अग्रवाल, आशिष धवन यांच्यासह इतर दिग्गजांचा क्रमांक लागतो. त्यांच्या एका इशाऱ्यावर बाजाराची चाल बदलते. ते बाजारातील खऱ्या अर्थाने महारथी आहेत.

हे आहेत शेअर बाजारातील महारथी

  1. राधाकिशन दमानी : हे तर शेअर बाजारातील गुरु आहेत. त्यांच्याकडे व्हीएसटी इंडस्ट्रीज, इंडिया सिमेंट्स, ट्रेंट आणि सुंदरम फायनान्स कंपन्यांची शेअर होल्डिंग आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत त्यांचा पोर्टफोलिओ 1,59,388 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिमाही समाप्त होताना एकूण पोर्टफोलिओ 1,54,007 कोटी रुपये होता.
  2. राकेश झुनझुनवाला कुटुंब : राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने वारसा चालविला आहे. सध्या या कुटुंबाकडे स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स, मेट्रो ब्रँड, टाटा मोटर्स आणि क्रिसिल सारख्या कंपन्यांचे शेअर आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत 39,703 कोटी रुपये इतके त्याचे मूल्य होते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. हेमेंद्र कोठारी : या यादीत हेमेंद्र कोठार हे एक मोठे नाव आहे. त्यांच्याकेड सोनाटा सॉफ्टवेअर आणि ईआयएच असोसिएटेड हॉल आणि इतर कंपन्यांचे शेअर आहेत. 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत या शेअरचे मूल्य 8820 कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत त्यांच्याकडील संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यावेळी हे 7978 कोटी इतकी किंमत होती.
  5. आकाश भंसाली : शेअर बाजार त्यांच्याकडे रामकृष्ण फोर्जिंग्स, आयडीएफसी, सुदर्शन केमिकल आणि लॉरस लॅब अशा कंपन्यांचे शेअर आहेत. त्यांचे एकूण मूल्य 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत 4781 कोटी रुपये होते.
  6. मुकुल अग्रवाल : बाजारात हे नाव परिचीत आहे. त्यांच्याकडे रेमेंड, रॅडिको खेतान, इंटेलेक्ट डिझाईन आणि पीडीएस अशा कंपन्यांत मोठी हिस्सेदारी आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत त्यांचे मूल्य 3902 कोटी रुपये होते.
  7. आशिष धवन : धवन यांच्याकडे आयडीएफसीमध्ये मोठा हिस्सा आहे. एम अँड एम फायनेन्शिअल सर्व्हिसेज, ग्लेनमार्क फार्मा, इक्विटास एसएफबी आणि ग्रीनलॅम कंपन्यांचे पण शेअर आहेत. त्यांचे एकूण मूल्य 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत 3206 कोटी रुपये होते.
  8. नेमिश शाह : शाह यांच्याकडे असाही इंडिया, बन्नारी अम्मान शुगर्स, लक्ष्मी मशीन वर्क्स, जोडियाक क्लोथिंग, यासह इतर कंपन्यांचे शेअर आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2792 कोटी रुपये होते.
  9. आशिष कचोलिया : कचोलिया यांच्याकडे सफारी इंडस्ट्रीज इंडिया, एडीएफ फुड्स, अडोर वेल्डिंग, बीटा ड्रग्स, फेज थ्री या कंपन्यांचे शेअर होल्डिंग आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1390 कोटी रुपये होते.
  10. अनिल कुमार गोयल : केआरबीएल लिमिटेड, अडोर फोनटेक, अमरज्योती स्पिनिंग मिल्स, एईसी, डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज अशा कंपन्यांचे शेअर होल्डिंग होते. 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1936 कोटी रुपये होते.
  11. युसुफ अली एमए : फेडरल बँकसह इतर कंपन्यांचे त्यांच्याकडे शेअर होल्डिंग आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1329 कोटी रुपये होते. शेअर बाजारात अजूनही अनेक दिग्गज आहे. बाजाराचा, कंपनीचा योग्य अभ्यास असेल तर नफा मिळवता येतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.