Bharti Airtel : भारतीय एअरटेलच्या चेअरमनपेक्षा अधिक पगार! हा कर्मचारी आहे तरी कोण?
Bharti Airtel : भारती एअरटेल गेल्या दीर्घ कालावधीपासून देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. सुनील मित्तल हे कंपनीचे चेअरमन आहेत. त्यांचा पगार सर्वाधिक असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही, कंपनीत त्यांचे वेतन सर्वाधिक नाही.
नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : भारती एअरटेल (Bharti Airtel) देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहापैकी एक आहे. एअरटेल एका दशकापर्यंत देशात सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचा कारभार केवळ भारतातच नाही तर इतर देशात पण चालतो. पारंपारिक टेलिकॉम सर्व्हिसेजसह भारती एअरटेल सॅटेलाईट इंटरनेट सेवा पण देते. भारती एअरटेल टेलिकॉम इंडस्ट्रीजत मोठे नाव आहे. इतक्या मोठ्या कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना साहजिकच जास्त पगार असेलच. पण वेतन चेअरमनपेक्षा असेल, हे पटत नाही. भारती एअरटेलचे संचालक सुनील मित्तल (Sunil Mittal) यांच्यापेक्षा एका कर्मचाऱ्याचे वेतन जास्त आहे. रिलायन्समध्ये पण एका कर्मचाऱ्याचे वेतन उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक आहे. भारती एअरटेलमध्ये पण चेअरमनपेक्षा या कर्मचाऱ्याचे वेतन (Salary) अधिक आहे.
चेअरमनपेक्षा अधिक पगार
कंपनीच्या वार्षिक रिपोर्टनुसार, कंपनीचे टॉप अधिकाऱ्यांचे वेतनाविषयीची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांचे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण वेतन 16.77 कोटी रुपये होते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांचा पगार सर्वात अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात विट्टल यांची वेतनापोटी एकूण कमाई 16.84 कोटी रुपये होती.
2022-23 असा झाला फरक
रिपोर्टमध्ये पगार जास्त असण्याची आकडेमोड मिळते. चेअरमन सुनील मित्तल यांचा पगार आणि अनुषांगिक भत्ते यामध्ये मोठा बदल झालेला नाही. त्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जितका पगार घेतला. तितकेच भत्ते घेतले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये त्यांचा वेतनात कोणताही बदल झाला नाही. मित्तल यांचा वार्षिक पगार आणि भत्त्यामध्ये गेल्या वर्षी 10.06 कोटी रुपये होता. तर विट्टल यांच्या वेतनात वार्षिक 10.4 टक्के वाढ झाली. त्यामुळे पगाराचा आकडा गेल्या आर्थिक वर्षात 10.09 कोटी रुपयांवर पोहचला.
गेल्या वर्षी मामुली तफावत
यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये मित्तल यांचा वार्षिक पगार एमडी विट्टल यांच्यापेक्षा जास्त होता. पण या दोघांच्या वेतनात मोठा फरक नव्हता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये मित्तल यांचे एकूण वेतन 15.39 कोटी रुपये होते. तर विट्टल यांना केपनीकडून एकूण 15.25 कोटी रुपये मिळत होते. त्यानंतर गेल्यावर्षी विट्टल यांच्या वार्षिक पगारात आणि भत्त्यात वाढ झाली. त्यामुळे त्यांचा पगार मित्तल यांच्यापेक्षा जास्त झाला.
असा आहे पगार
कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात विट्टल यांना 16.84 कोटी रुपयांचा वार्षिक पगार होता. त्यामध्ये 10.09 कोटींचा पगार आणि अनुषांगिक भत्ते मिळाले. याशिवाय त्यांना 6.74 कोटी रुपयांचा इन्सेटिव्ह, जोरदार कामगिरीमुळे मिळाला. त्यांना काही अतिरिक्त सुविधा पण देण्यात आल्या. तर मित्तल यांचा वार्षिक पगार 16.77 कोटी रुपये आहे. यामध्ये 10.06 कोटी रुपये वेतन आणि भत्ते आहेत. तर इन्सेटिव्ह 4.5 कोटी रुपये आहे. अतिरिक्त सुविधेसाठी 2.2 कोटी रुपये मिळतात.