Green Energy | अक्षय ऊर्जा क्षेत्रात हे दोन श्रीमंत भिडणार..

Green Energy | अक्षय ऊर्जा क्षेत्रात देशातील दोन दिग्गज उद्योगपती मोठी गुंतवणूक करत आहेत. येत्या 10 वर्षांत या क्षेत्रातील त्यांची गुंतवणूक वाढणार आहे.

Green Energy | अक्षय ऊर्जा क्षेत्रात हे दोन श्रीमंत भिडणार..
अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 5:49 PM

Green Energy | देशातील दोन दिग्गज श्रींमत गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात अजून एका क्षेत्रात थेट सामना रंगणार आहे. अक्षय ऊर्जा (green energy) क्षेत्रात ही टक्कर दिसेल. अदानी समूह या क्षेत्रात 2030 पर्यंत 70 अरब डॉलरची गुंतवणूक करणार आहे. तर अंबानी समुहाचे ग्रीन एनर्जी क्षेत्रात 75 अरब डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य आहे.

गीगा फॅक्टरी उभारणार

अदानी समूह ग्रीन एनर्जी मिशन (green energy mission)अंतर्गत वीज उत्पादन क्षेत्रात उतरणार आहे. कंपनी सौर ऊर्जा, पवनऊर्जा आणि हायड्रोजन इलेक्ट्रोलाईजर या माध्यमातून वीज उत्पादन करेल.

70 अरब डॉलरची गुंतवणूक

त्यासाठी तीन गीगा फॅक्टरी उभारण्यात येणार आहे. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात जगातील सर्वात मोठी कंपनीसाठी अदानी ग्रुप तयारी करत आहे. अदानी समूह या क्षेत्रासाठी 2030 पर्यंत 70 अरब डॉलर गुंतवणूक करणार आहे.

हे सुद्धा वाचा

30 लाख टन ऊर्जेचे लक्ष्य

गीगा कारखान्यांमध्ये सौर ऊर्जा मॉड्यूलपासून हायड्रोजन ऊर्जापर्यंत उत्पादन होणार आहे. अदानी समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवणार आहे. ग्रुप 2030 पर्यंत 30 लाख टन हाइड्रोजन ऊर्जा उत्पादन करेल.

अंबानी समुहाची गुंतवणूक

अदानी समुहाची प्रतिस्पर्धी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ने पाचवा गीगा कारखाना स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यात कमी कार्बन ऊत्सर्जन होणार आहे. कंपनीने स्वतःच्या वापरासाठी 2025 पर्यंत 20 गीगावाट सौर ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे.

चार कारखान्यांची तयारी

रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी चार गीगा कारखाने स्थानप करण्याची घोषणा केली होती. या कारखान्यात पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक होऊ घातली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.