हा तरुण आठवड्यातील केवळ ३० तास काम करतो आणि कमाई तब्बल २.१५ कोटी रुपये

एकीकडे देशात कामाचे तास वाढविण्याविषयी दिग्गज उद्योगपती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी वक्तव्य केल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरु आहे. यातच एक २४ वर्षीय तरुण मात्र आठवड्याचे केवळ ३० तास काम करुन वार्षिक २.१५ कोटी रुपयांची कमाई करीत आहे. काय करतो हा तरुण पाहा

हा तरुण आठवड्यातील केवळ ३० तास काम करतो आणि कमाई तब्बल २.१५ कोटी रुपये
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 2:53 PM

सध्या देशात कामाच्या तासांवरुन चर्चा सुरु आहे. लॉंग वर्कींग अवर आणि वर्क लाईफ बॅलन्स यावरुन अनेक उद्योजकांनी चर्चेला तोंड फोडले आहे. काही उद्योगपतींनी आठवड्यातून ७० तास काम करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. परंतू हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते अधिक वर्क लोड शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. त्यामुळे नोकरदारांनी वर्क लाईफ बॅलन्स करायला हवे. म्हणजे काम असे असावे ज्याने आपल्या पर्सनल लाईफला वेळ मिळेल. या दरम्यान २४ वर्षाचे बिझनसमनने आपण आठवड्यात केवळ ३० तास काम करुन वार्षिक २,५४,००० डॉलरची कमाई ( दोन कोटी रुपयांहून अधिक ) करतो असे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे.

स्टीव्हन गुओ यांची कहाणी प्रेरणा देणारी आणि रंजक आहे. जी वर्क लाईफ बॅलन्स आणि स्मार्ट वर्कला महत्व देते. त्यांनी आठवड्यात केवळ तीस तास काम करुन यशाचा मार्ग केवळ जादा तास काम करुन नव्हे तर योग्य नियोजन आणि इच्छाशक्तीने आपण हे साध्य करु शकतो असे स्टीव्हन गुओ यांनी म्हटले आहे.

स्टीव्हन यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की चांगल्या वर्क लाईफसाठी ते अमेरिका सोडून इंडोनेशियाच्या बाली येथे गेले. ही जागा अतिशय चांगली असून येथे आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स काय आहे ते कळल्याचे स्टीव्हन यांनी सांगितले. ते सकाळी आपला बिझनेस चालवतात. दुपारी सर्फींग आनंद घेतात नंतर सायंकाळी नवीन गोष्टी शिकणे, बालीची संस्कृती एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात.

हे सुद्धा वाचा

वयाच्या १२ वर्षी व्यवसाय सुरु

आपण १२ वर्षांचे असताना पहिला बिझनेस सुरु केला होता, ते आपण एक व्हिडीओ गेम प्लेअर होतो. काही महिन्यातच दहा हजार डॉलरचा बिझनेस झाला होता. त्यानंतर गेम डेव्हलपमेंट कंपनी सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला,त्यात आपले पैसे बुडाल्याचे आणि त्यातून शिकत मार्केटिंगचे आपल्याला महत्व समजून ते आत्मसात केल्याचे स्टीव्हन यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून बिझनस इकोनॉमिक्सचे शिक्षण घेतले. परंतू मार्क कमी मिळाल्याने त्यांनी नोकरी ऐवजी बिझनस सुरु केला.आज स्टीव्हन अमेरिका, युके आणि फिलीपाईन्स येथे १९ लोकांची कंपनी चालवतात.

पर्यटनाची देखील आवड

आपला ४० टक्के वेळ क्लायंट आणि प्रोडक्टच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीत घालवतो असे २४ वर्षीय स्टीव्हन सांगतात . त्यांच्या यशस्वी बिझनसमध्ये एक ऑनलाईन रिटेलर असून ते खजूराची विक्री करतात. एक अन्य कंपनी लक्झरी कारचे कव्हर विक्री करते. स्टीव्हन यांना पर्यटनाचाही छंद असून त्यानी आतापर्यंत १५ देशांचा प्रवास केला आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.