अबब! या बँकेने 84000 ग्राहकांना न मागता दिले कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
एका मीडिया रिपोर्टनुसार, अज्ञात व्हिसलब्लोअरने काही अटींसह कर्जाच्या नूतनीकरणासाठी (कर्ज एव्हरग्रीनिंग) इंडसइंड बँकेची उपकंपनी असलेल्या BFIL द्वारे दिलेल्या अशा कर्जाबाबत बँक व्यवस्थापन आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ला पत्र लिहिले.
नवी दिल्लीः ‘लोन एव्हरग्रीनिंग’वरील व्हिसलब्लोअरचे दावे पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे सांगत इंडसइंड बँकेने मे महिन्यात 84,000 हजार ग्राहकांना तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या संमतीशिवाय कर्ज दिल्याची कबुली दिलीय. ‘एव्हरग्रीनिंग’ म्हणजे नवीन कर्ज देणे असते. कर्जाचे नूतनीकरण करणारी कंपनी पुन्हा कर्ज देते. फील्ड कर्मचार्यांनी ग्राहकांना दोन दिवसांच्या आत संमतीशिवाय कर्ज देण्याबद्दल माहिती दिली होती, त्यानंतर ही त्रुटी वेगाने सुधारली गेली, असंही बँकेनं स्पष्ट केले.
कर्जाबाबत बँक व्यवस्थापन आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ला पत्र
एका मीडिया रिपोर्टनुसार, अज्ञात व्हिसलब्लोअरने काही अटींसह कर्जाच्या नूतनीकरणासाठी (कर्ज एव्हरग्रीनिंग) इंडसइंड बँकेची उपकंपनी असलेल्या BFIL द्वारे दिलेल्या अशा कर्जाबाबत बँक व्यवस्थापन आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ला पत्र लिहिले. अशा प्रकारे जेथे विद्यमान ग्राहक कर्जाची परतफेड करू शकत नव्हते, त्यांना नवीन कर्ज देण्यात आले, जेणेकरून खातेपुस्तके स्वच्छ ठेवता येतील.
ही चूक मे 2021 मध्ये घडली होती
या आरोपांवर बँकेने म्हटले आहे की, “आम्ही कर्ज सदाबहाराचे आरोप पूर्णपणे नाकारतो. BFIL द्वारे जारी केलेली आणि व्यवस्थापित केलेली कर्जे नियामकाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच वितरित केली जातात. यामध्ये कोविड 19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या उद्रेकादरम्यान दिलेल्या कर्जाचाही समावेश आहे.” बँकेने सांगितले की, मे 2021 मध्ये तांत्रिक बिघाडामुळे सुमारे 84,000 ग्राहकांना परवानगीशिवाय कर्ज देण्यात आले.
26 हजार सक्रिय ग्राहक
ज्या 84 हजार ग्राहकांना कर्ज वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी 26 हजार 73 ग्राहक सप्टेंबर 2021 अखेर सक्रिय होते. त्याच्यावरील थकीत कर्ज 34 कोटी होते, जे सप्टेंबर तिमाहीच्या पोर्टफोलिओच्या 0.12 टक्के आहे.
सप्टेंबर तिमाही निकाल
सप्टेंबर तिमाहीत इंडसइंड बँकेची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. वार्षिक आधारावर बँकेच्या नफ्यात 72 टक्क्यांनी वाढ झाली असून तिचा निव्वळ नफा 1113 कोटी इतका आहे. सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 647 कोटी होता. सप्टेंबर तिमाहीत, व्याज उत्पन्नात सुमारे 6.59 टक्क्यांनी वाढ झाली आणि ती 7650 कोटी होती. या तिमाहीत तरतुदीत घट झाली आणि ती 1703 कोटी झाली.
संबंधित बातम्या
मोठी बातमी! आता बांधकामाच्या पूर्णत्वाशिवाय बिल्डरला ताब्याचा दबाव आणता येणार नाही
7th Pay Commission: 11 लाख कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार, 8100 रुपयांपेक्षा जास्त फायदा, पटापट तपासा