Multibagger Stock : या बांधकाम कंपनीचे वारे न्यारे! 448 कोटींची मिळाली वर्क ऑर्डर, शेअर तर तुफान धावणारच
Multibagger Stock : हा शेअर बाजारात धुमाकूळ घालणार आहे. ही बांधकाम कंपनी आहे. तिला आता 448 कोटींचा कार्यादेश मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर एकदम सूसाट धावेल.
नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. बाजारात चढउतार होत असला तरी मध्यंतरी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. त्यांचे मोठे नुकसान झाले. बाजाराकडे अनेक गुंतवणूकदारांना पाठ फिरवली आहे. सोने-चांदीत त्यांनी गुंतवणूक वाढवली आहे. सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. दररोज एक एक रेकॉर्ड तयार होत आहे. अशावेळी काही कंपन्या शेअर बाजारात सोन्यापेक्षाही अधिकचा परतावा देत आहेत. बाजार घसरणीवर असतानाही या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या (Investors) झोळीत मोठा परतावा टाकला आहे. एका बांधकाम कंपनीच्या शेअरवर सध्या गुंतवणूकदार लट्टू आहेत. कोणता आहे हा शेअर..
कंपनीला मिळाली 448 कोटी वर्क ऑर्डर एनबीसीसी इंडिया(NBCC India) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी शहर आणि गृहनिर्माण मंत्रालयाअंतर्गत येते. काही दिवसांपूर्वीच या कंपनीला गृहमंत्रालया अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट कडून 448 कोटी रुपयांचा कार्यादेश मिळाला. त्यामुळे या कंपनीचा शेअर पुन्हा चर्चेत आला.
काय आहे काम या कंपनीला मिझोरममध्ये भारत-बांग्लादेशातील सीमेजवळ जवळपास 88.58 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्याचे काम मिळाले आहे. एनबीसीसी ने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली आहे. NBCC India चे बाजारातील भागभांडवल जवळपास 6,430 हजार कोटी रुपये आहे. येत्या काही दिवसांत कंपनीची घौडदौड जोरदार असेल.
आता किती किंमत NBCC Indiaचा शेअर सोमवारी, 3 एप्रिल रोजी एनएसईवर 0.71 टक्के तेजीवर होता. त्याची किंमत 35.70 रुपये होती. या कंपनीच्या उच्चांकी भाव गेल्यावर्षी 43.75 रुपये होता. तर या शेअरने गेल्यावर्षीच निच्चांकी कामगिरी बजावली होती. त्यावेळी हा शेअर 26.55 रुपयांवर होता. सध्या हा शेअर त्याच्या निच्चांकी स्तरापेक्षा जवळपास 34.27 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
इतका दिला परतावा NBCC India ने शेअर बाजारात 2012 साली प्रवेश केला. एप्रिल 2012 साली हा शेअर एनएसईवर सुचीबद्ध झाला. तेव्हापासून या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरने आतापर्यंत 465 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या पाच दिवसांत हा शेअर जवळपास 9.01 टक्के वधारला आहे. गेल्या एक महिन्यापासून या शेअरमध्ये 0.28 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर एका वर्षांत या शेअरची किंमत 11.21 टक्क्यांनी वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांचे नशीब चमकवेल. ते मालामाल होतील. त्यांना मोठा परतावा मिळेल.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. संपूर्ण माहिती, अभ्यास करुन आणि बाजारातील तज्ज्ञांचा सल्ल्यानेच गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल.