15 दिवसांतच मालामाल गुंतवणूकदार, सरकारी कंपनीचा शेअर अडीच पट वधारला

IREDA Share Market | या सरकारी कंपनीने गेल्या 15 दिवसांतच मोठा पल्ला गाठला. कंपनीचा शेअर सूसाट पळाला. गुंतवणूकदारांचे पंधरवाड्यातच नशीब पालटले. ज्यांनी 30 रुपयांनी हा शेअर खरेदी केला. त्यांना दोनच आठवड्यात अडीच पट फायदा झाला. हा शेअर 112 रुपयांवर पोहचला. ही कंपनी अजून मोठा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.

15 दिवसांतच मालामाल गुंतवणूकदार, सरकारी कंपनीचा शेअर अडीच पट वधारला
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 9:20 AM

नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : शेअर बाजारात सरकारी कंपन्या पण दमदार कामगिरी बजावताना दिसतात. खासगी कंपन्यांसारखाच या कंपन्याचा आलेख उंचावतो. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना ताबडतोब मिळतो. कमी वेळेत जास्त परतावा देणाऱ्या शेअरच्या शोधात गुंतवणूकदार असतात. या सरकारी कंपनीने हीच कमाल केली आहे. अवघ्या 15 दिवसांत या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाईचा मौका दिला. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्ह एजेन्सीने ( IREDA) ही कमाल केली. सार्वजनिक सेवेतील या कंपनीचा शेअर 30 रुपयांहून शेअर थेट 112 रुपयांवर पोहचला. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली.

प्रत्येक दिवशी अप्पर सर्किट

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी IREDA ने शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर नवनवीन रेकॉर्ड खात्यावर जमा केले. या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. या आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात, बुधवारी या शेअरमध्ये 9.97 टक्क्यांची जोरदार तेजी आली. हा शेअर 112 रुपयांवर बंद झाला. ही या शेअरची उच्चांकी कामगिरी आहे.

हे सुद्धा वाचा

50 रुपयांवर सूचीबद्ध

या 29 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. IREDA च्या आयपीओची इश्यू प्राईस 32 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. तर बाजारात हा शेअर 50 रुपये प्रति शेअरवर सूचीबद्ध झाला. प्रत्येक लॉटवर गुंतवणूकदाराला 8,280 रुपयांचा नफा झाला. तर लिस्टिंगनंतर शेअरमध्ये तेजीचे सत्र कायम आहे. शेअर 60 रुपयांपर्यंत पहोचला. एक लॉटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटपट 12,880 रुपयांची लॉटरी लागली. सध्या एका शेअरची किंमत 112 रुपयांवर पोहचली आहे. म्हणजे या शेअरमध्ये 75 टक्क्यांची तेजी आली आहे. 29 नोव्हेंबरपासून गुंतवणूकदारांची कमाई जवळपास तिप्पट झाली आहे.

1 लाख कोटींच्या बाजारावर लक्ष

IREDA कंपनी, सोलर अँड रिन्युएबल एनर्जी सेक्टरच्या प्रकल्पांना वित्त पुरवठा करते. गेल्या काही दिवसातील घडामोडींवर लक्ष दिल्यास, कंपनीने 5 डिसेंबर रोजी अक्षय ऊर्जा प्रकल्पांना अर्थ पुरवठा करण्यासाठी नवीन रिटेल विभाग सुरु केल्याचे समोर येत आहे. त्यानंतर हा शेअर सूसाट पळाल्याचे दिसून येते. बाजारातील तज्ज्ञांनुसार, या कंपनीला लवकरच नवरत्न कंपनीचा दर्जा मिळू शकतो.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.