Gautam Adani : 4 महिन्यात छापले 25,000 कोटी! अदानी समूहाच्या शेअर्सने पालटले नशीब

Gautam Adani : गौतम अदानी यांचे शेअर या वर्षांत हिंडनबर्गच्या वादळात अडकले. तेव्हापासून ते तळ्यातमळ्यात खेळत आहेत. कधी सूसाट धावतात तर कधी मोठा खड्डा खोदतात. पण तरीही या व्यक्तीने अदानींच्या शेअरवर 25,000 कोटींची कमाई केली..

Gautam Adani : 4 महिन्यात छापले 25,000 कोटी! अदानी समूहाच्या शेअर्सने पालटले नशीब
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : गेल्यावर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत तिसरा मान पटकावणारे उद्योगपती गौतम अदानी उंच भरारी मारण्याच्या प्रयत्नात आहेत. हिंडनबर्गच्या वादळात त्यांच्या गलबताचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या अनेक कंपन्यांनी हेलखावा खाल्ला आणि अनेक गुंतवणूकदारांना हलेकावा दिला. तेव्हापासून ते तळ्यातमळ्यात खेळत आहेत. कधी सूसाट धावतात तर कधी मोठा खड्डा खोदतात. पण काहींना अदानी ग्रुप हा (Adani Group) अलादीनच्या जादुई दिव्यासारखाच हाती लागला. योग्य वेळी केलेली गुंतवणूक राजीव जैन (Rajiv Jain) यांना पुन्हा हजारो कोटींचा मालक करुन गेली. त्यांनी अवघ्या चार महिन्यात अदानींच्या शेअरवर 25,000 कोटींची कमाई केली.

रिस्क है तो इश्क है

जोखिमेशिवाय कधी कधी मोठं काही गवसत नाही म्हणतात. जोखीम घेतली तर जबरदस्त परतावा पण मिळू शकतो. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्मने पण हाच कित्ता गिरवला. राजीव जैन यांच्या जीक्यूजी पार्टनर्स (GQG Partners) जोखीम उचलली. विपरीत परिस्थितीत त्यांनी अदानी समूहात गुंतवणूक केली.

हे सुद्धा वाचा

विपरीत परिस्थितीत गुंतवणूक

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदानी समूहावर तोफेगोळ डागले. हा समूह पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. अशा विपरीत परिस्थितीत इतर गुंतवणूकदारांनी अदानी समूहात गुंतवणूक काढली. तर जीक्यूजी पार्टनर्सने गुंतवणूक वाढवली. त्याचा फायदा त्यांना झाला.

जोरदार परतावा

काही महिन्यातच अदानी समूहाच्या शेअर्सनी पुन्हा आघाडी उघडली. त्यांची घौडदोड सुरु झाली. जीक्यूजी पार्टनर्सला गुंतवणूकीचा फायदा झाला. या समूहाच्या गुंतवणुकीचे मूल्य 25,000 कोटीवर पोहचले. जीक्यूजीने अदानी समूहाच्या 5 शेअर्समध्ये गुंतवणूक केली. परदेशी भारतीय राजीव जैन यांच्या या फर्मने मार्च 2023 मध्ये अदानी कंपन्यांमध्ये 1.9 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. मे 2023 मध्ये 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. जून 2023 मध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. त्याचा जोरदार परतावा त्यांना मिळाला.

अदानींच्या शेअर्समध्ये तेजीचे सत्र

हिंडनबर्गच्या हल्ल्यानंतर अदानी यांच्या शेअर्समध्ये तेजीचे सत्र आहे. एप्रिल महिन्यानंतर आतापर्यंत अदानी एंटरप्राईजेसने 41 टक्क्यांची उसळी घेतली. तर अदानी टोटल, अदानी गॅस, अदानी विल्मरमच्या शेअरमध्ये वाढ झाली.

राजीव जैन यांची गुंतवणूक

  1. अदानी एंटरप्राईजेसमध्ये 2.67 टक्के वाटा, एकूण मूल्य 7535 कोटी रुपये
  2. अदानी ग्रीन मध्ये 3.50 टक्के हिस्सा, त्याचे मूल्य 6315 कोटी रुपये
  3. अदानी पोर्ट्स मध्ये 3.10 टक्के हिस्सेदारी, एकूण मूल्य 5045 कोटी रुपये
  4. अदानी ट्रांसमिशनमध्ये 5.35 टक्के हिस्सा, एकूण मूल्य 4871 कोटी रुपये
  5. अंबुजा सीमेंटमध्ये 1.3 6 टक्के वाटा, एकूण मूल्य 1197 कोटी रुपये

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.