Ratan Tata Right Hand : ही व्यक्ती आहे रतन टाटा यांची खास! एक दिवसाची कमाई 30 लाख

Ratan Tata Right Hand : ही व्यक्ती भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची खास आहे. टाटा समूहात ही व्यक्ती आल्यापासून अनेक ठिकाणी नफ्याचे भक्कम गणित जुळून आले आहे. भारतातील कोणत्याही खासगी कंपनीत सर्वाधिक वेतन घेणारी ही व्यक्ती आहे.

Ratan Tata Right Hand : ही व्यक्ती आहे रतन टाटा यांची खास! एक दिवसाची कमाई 30 लाख
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 6:36 PM

नवी दिल्ली : शेतकरी कुटुंबातून आलेल्या या व्यक्तीने भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या मनात खास जागा मिळवली आहे. टीसीएसमध्ये प्रशिणार्थी उमेदवार, इंटर्न (Internship) म्हणून, शुन्यातून सुरुवात केलेली ही व्यक्ती आज, सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती आहे. टाटा समूहात ही व्यक्ती आल्यापासून अनेक ठिकाणी नफ्याचे भक्कम गणित जुळून आले आहे. भारतातील कोणत्याही खासगी कंपनीत सर्वाधिक वेतन घेणारी ही व्यक्ती आहे. टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्या वादात या व्यक्तीने टाटा सन्सचा (Tata Sons) कारभार सांभाळला आणि या कंपनीला फायदा मिळवून दिला. या व्यक्तीची एका दिवसाची कमाई 30 लाख रुपये आहे.

एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekaran) यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. टाटा समूहाचे चेअरमन होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मेहनत, कष्ट, सचोटीच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केले. TCS कंपनीत ते प्रशिणार्थी उमेदवार म्हणून आले. त्यांनी इंटर्नशीप (Internship) केली. चंद्रशेखरन 2017 मध्ये टाटा समूहाच्या उच्च पदावर पोहचले. टाटा सायरस वादात त्यांनी टाटा सन्सची जबाबदारी संभाळली.

एन. चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 मध्ये तामिळनाडू मध्ये एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यानंतर कोईंबत्तूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी अप्लाईट सायन्सची पदवी घेतली. कम्प्यूटर प्रोग्रामिंगकडे त्यांचा जास्त ओढा होता. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये (MCA) पदवी घेतली.

हे सुद्धा वाचा

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1987 मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) रुजू झाले. पुढील दोन दशकात त्यांनी मेहनत, कष्ट आणि सचोटीच्या बळावर अनेक पदांवर काम केले. 2007 मध्ये त्यांनी टीसीएस मंडळात सहभागी करुन घेण्यात आले. त्याठिकाणी त्यांनी चिफ ऑफरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून काम पाहिले. 2009 मध्ये 46 वर्षांचे असताना ते टीसीएसचे सीईओ झाले. टाटा समूहात इतक्या कमी वयात सीईओ पदी विराजमान होणाऱ्या मोजक्याच कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

चंद्रशेखरन यांच्या पत्नीचे नाव ललिता आहे. त्यांच्या मुलाचे नाव प्रणव चंद्रशेखरन आहे. 2019 मध्ये चंद्रशेखरन यांचे वार्षिक वेतन 65 कोटी रुपये होते. यामध्ये सातत्याने वाढ झाली. 2021-22 मध्ये वार्षिक 109 कोटी रुपये पगार झाला. देशातील सर्वाधिक पगार घेणारे ते एकमेव संचालक झाले. त्यांनी 2020 मध्ये मुंबईतील पेडर रस्त्यावर 98 कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. 6,000 वर्ग फुटावरील या फ्लॅटचे मासिक भाडे 20 लाख रुपये होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.