World Richest Beggar : ऐकावे ते नवलच! हा आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी, 7 कोटींची एकूण संपत्ती

World Richest Beggar : जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे, माहिती आहे का? कमाईत हा भिकारी भल्याभल्यांना मागे टाकतो. त्याचा आलिशान फ्लॅट आहे. तो महिन्याकाठी 60 ते 75 हजारांची कमाई करतो.

World Richest Beggar : ऐकावे ते नवलच! हा आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी, 7 कोटींची एकूण संपत्ती
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 3:38 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, भारतातील अब्जाधीश, श्रीमंत व्यक्ती आणि आशियातील गर्भश्रीमंतांची नावे तुम्हाला माहिती असतील. त्यांच्याविषयी तुम्ही अनेकदा वाचले पण असेल. काही आठवड्यात श्रीमंतांच्या यादीत होणाऱ्या उलटफेराची अपडेट पण तुम्हाला मिळाली असेल. पण एखाद्या भिकारी करोडपती असल्याचे कधी तुम्ही ऐकले आहे का? जगातील सर्वात श्रीमंत भिकारी (World Richest Beggar) कोण आहे, माहिती आहे का? कमाईत हा भिकारी भल्याभल्यांना मागे टाकतो. त्याचा आलिशान फ्लॅट आहे. तो महिन्याकाठी 60 ते 75 हजारांची कमाई करतो. त्याच्याकडे आजच्या घडीला एकूण 7 कोटींहून अधिकची संपत्ती आहे.

भिकारी नव्हे व्यवसाय दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत, जगणे ही अवघड, फाटके कपडे, विखुरलेले केस, मळकट, कळकट असा काहीसा भिकारी आपण नेहमी पाहतो. भिक मागणे आपल्याकडे कायद्याच्या परिभाषेत गुन्हा ठरतो. हा अत्यंत गरीब वर्ग असतो. गरजेपोटी अनेक लोक रस्त्यावर, धार्मिक स्थळांबाहेर भीक मागतात. पण काही लोकांचा हा व्यवसाय झाला आहे. मोठंमोठ्या शहरात असा व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक भिकारी आले आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण? जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबई शहरात राहतो. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, जागतिकस्तरावर भरत जैन हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखल्या जातो. भरत मुंबईतील रस्त्यांवर भीक मागतात. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. कमी वयात त्यांना भीक मागावी लागली. त्यानंतर त्यांनी हेच काम केले. त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना दोन मुलं आहेत. एक भाऊ आणि वडिल पण त्यांच्यासोबतच राहतात.

हे सुद्धा वाचा

दरमहा 60 हजारांची कमाई सुरुवातीला आर्थिक परिस्थिती नसल्याने भरत जैन यांना भीक मागावी लागली. पण आपल्या मुलांना भीक मागावी लागू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुलांना इंग्रजी शाळांमध्ये दाखल केले आहे. भरत जैन यांनी भीक मागून 7.5 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे. दरमहा भीक मागून ते 60 हजार रुपये ते 75 हजार रुपये कमाई करतात.

1.2 कोटींचा फ्लॅट भरत जैन यांच्याकडे मुंबईत 1.2 कोटी रुपयांचा दोन बेडरुमचा फ्लॅट आहे. ठाण्यामध्ये त्यांनी दोन दुकाने भाड्याने दिली आहे. त्यांचे दरमहा 30,000 रुपये भाडे त्यांना मिळते. भरत जैन हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अथवा आझाद मैदान परिसरात भीक मागताना आढळतात. आजही भरत जैन मुंबईतील रस्त्यांवर भीक मागतात. जैन 10 ते 12 तासात प्रत्येक दिवशी 2500 रुपयांपर्यंत पैसे जमवतात.

मुलं इंग्रजी शाळेत परळ भागात भरत जैन कुटुंबासह राहतात. त्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात. कुटुंबातील एक सदस्य स्टेशनरी स्टोअर चालवतो. त्यांना आता भीक मागू नका, असा कुटुंबिय आग्रह करतात. पण ते आजही मुंबईतील रस्त्यांवर भीक मागतात.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.