Rekha Jhunjhunwala : Tata शेअरची कमाल, काही मिनिटांतच रेखा झुनझुनवाला यांची 500 कोटींची कमाई

Rekha Jhunjhunwala : टाटाच्या या शेअरमुळे रेखा झुनझुनावाला यांना अवघ्या काही मिनिटांतच 500 कोटींची कमाई करता आली. त्यांना बंपर लॉटरी लागली. या वर्षात या शेअरने कमाल उडवून दिली. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला, तुम्ही पण केली का गुंतवणूक?

Rekha Jhunjhunwala : Tata शेअरची कमाल, काही मिनिटांतच रेखा झुनझुनवाला यांची 500 कोटींची कमाई
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 2:44 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची ओळख आहे. त्यांना भारतीय शेअर बाजाराचा वॉरेन बफे सुद्धा म्हणतात. त्यांनी त्यावेळी दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक किती फायदेशीर ठरली याचे उदाहरण आता आपल्यासमोर आहे. संयम आणि दीर्घकाळ गुंतवणूक हा त्यांचा मंत्र होता. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर पत्नी त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहे. त्यांनी काही शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली होती. टाटाच्या या शेअरमुळे रेखा झुनझुनावाला (Rekha Jhunjhunwala) यांना अवघ्या काही मिनिटांतच 500 कोटींची कमाई करता आली. त्यांना बंपर लॉटरी लागली. या वर्षात या शेअरने (Tata Share) कमाल उडवून दिली. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला, तुम्ही पण केली का गुंतवणूक?

शेअरने उडवली धमाल टाटा समूहातील टायटन हा मल्टिबॅगर शेअर ठरला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना निराश केले नाही. त्याची आगेकूच सुरु आहे. शुक्रवारी या शेअरने जवळपास 3 टक्क्यांची उसळी घेतली. या शेअरचा 52 आठवड्यांचा हा उच्चांक आहे. दुपारच्या सत्रात हा शेअर 3,211.10 रुपयांवर पोहचला होता.

500 कोटींची लॉटरी राकेश झुनझुनवाला यांनी फार पूर्वीच टायटनमध्ये गुंतवणूक केलेली होती. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला त्यांचा पोर्टफोलिओ सध्या संभाळत आहेत. त्यांना काही मिनिटांतच या शेअरमुळे जवळपास 500 कोटी रुपयांचा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

आवडता स्टॉक राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमध्ये फार पूर्वीपासून गुंतवणूक केली. टाटा समूहाचा हा शेअर लंबी रेस का घौडा असल्याचे त्यांनी अगोदररच ओळखले होते. हा त्यांचा सर्वात आवडता शेअर होता. त्यांनी या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. त्यांच्यानंतर रेखा झुनझुनवाला यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली.

इतके आहेत शेअर्स मार्च 2023 तिमाहीमधील आकेडवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,69,45,970 इक्विटी शेअर असून कंपनीत त्यांचा वाटा 5.29 टक्के इतका आहे. या शेअरचे मूल्य जवळपास 12,138.6 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांची या कंपनीत 5.2 टक्के हिस्सेदारी होती.

गुंतवणूकदार मालामाल टाटा कंपनीच्या या स्टॉकने सुरुवातीपासूनच कमाल केली आहे. गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक फायदा झाला. 1 जानेवारी 1999 रोजी हा स्टॉक केवळ 4.27 रुपयांना होता. दुपारच्या सत्रात हा शेअर 3,211.10 रुपयांवर पोहचला होता. या स्टॉकने आतापर्यंत 278.99 टक्के परतावा दिला.

233 कोटींचा फायदा जानेवारी ते मार्च 2023 तिमाहीत टायटन कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनावाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,69,45,970 शेअर आहे. टायटन कंपनीत त्यांचा 5.29 टक्के वाटा आहे. टायटन यांच्या कंपनीचा प्रति शेअर 49.70 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे रेखा झुनझुनवाला यांना 2,33,32,14,709 रुपये म्हणजे जवळपास 233 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.