Tata Group : परदेशातही टाटाचा डंका! आता 55 देशांमध्ये या कंपनीची सेवा, तुम्हाला काय होईल फायदा

Tata Group : टाटा हा भारताचा सर्वात विश्वसनीय समूह मानण्यात येतो. टाटाची ही कंपनी जगातील 5 खंड आणि 55 देशात डंका वाजवत आहे. 1979 मध्ये पहिल्यांदा या कंपनीने परदेशात पाऊल ठेवले होते. तेव्हापासून या कंपनीने परदेशात डंका वाजवला आहे.

Tata Group : परदेशातही टाटाचा डंका! आता 55 देशांमध्ये या कंपनीची सेवा, तुम्हाला काय होईल फायदा
जगभर डंका
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 5:25 PM

नवी दिल्ली : टाटा (Tata Group) हा भारताचा सर्वात विश्वसनीय समूह मानण्यात येतो. टाटाची ही कंपनी जगातील 5 खंड आणि 55 देशात डंका वाजवत आहे. टाटा समूहातंर्गत अनेक कंपन्या काम करतात. या समूहाचे अनेक सेक्टरमध्ये जोरदार काम सुरु आहे. पण या समूहातील एक कंपनी इतर सर्व कंपन्यांवर भारी पडली आहे. ही कंपनी तशी 1968 मध्ये सुरु झाली. 1979 मध्ये पहिल्यांदा या कंपनीने परदेशात पाऊल ठेवले होते. तेव्हापासून या कंपनीने परदेशात डंका वाजवला आहे. कंपनीचे परदेशात आलिशान कार्यालये आहेत. या कंपनीचे जगभरात 6,00,000 हून अधिक कर्मचारी आहेत. संपूर्ण जगात झेंडा फडकवणारी ही कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) आहे. टीसीएस नावाने तिची ओळख आहे. ही बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (International Information Technology) कंपनी आहे. देशातच नाही तर कंपनीने परदेशातही डंका वाजवला आहे. जगातील नामांकित आयटी कंपन्यांपैकी ही एक आहे.

टाटा समूहातंर्गत काम करणाऱ्या टीसीएसचे (TCS) मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे. बाजारातील भांडवलाच्या आधारे ही भारतातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. हा जगातील मोठा आयटी ब्रँड आहे. सप्टेंबर 2021 मध्ये टीसीएसचे बाजारातील भांडवल 200 अब्ज डॉलर इतके होते. असा विक्रम करणारी ही भारतातील पहिली आयटी कंपनी आहे.

टीसीएसची सुरुवात 1968 मध्ये झाली आहे. तेव्हा टाटा कम्प्युटर सिस्टम्स या नावाने ही कंपनी ओळखली जात होती. त्यावेळी ही कंपनी TISCO (आताचे टाटा स्टील), सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाला सेवा पुरवत होती. 1980 मध्ये पुण्यात या कंपनीने भारतातील पहिले डेडिकेटेड सॉफ्टवेअर रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर सुर केले.

हे सुद्धा वाचा

25 ऑगस्ट 2024 रोजी टीसीएस एक सार्वजनिक नोंदणीकृत कंपनी झाली. 2005 मध्ये बायोइन्फरमेटिक्स मार्केटमध्ये कंपनीने शिरकाव केला. असे काम करणारी टीसीएस ही भारतातील पहिली कंपनी ठरली. टीसीएस भारतात पासपोर्ट सेवाही देते. तिचे अनेक केंद्र भारतात आहेत. 1979 मध्ये पहिल्यांदा परदेशात, अमेरिकेत या कंपनीचे कार्यालय सुरु झाले होते.

सध्या टीसीएसचा शेअर घसरणीवर आहे. या शेअरमध्ये 29 टक्क्यांची पडझड झाली आहे. सध्या हा शेअर 3,390 रुपयांवर आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात हा शेअर जोरदार परतावा देईल. 29 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे. तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना हा आयटी स्टॉक जास्त परतावा देईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.