AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Update News : शुक्रवारी पण सोन्यात पडझड, 10 ग्रॅम झाले इतके स्वस्त!

Gold Price Update News : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढउतार आला. पण भाव सातत्याने घसरणीवरच होते. शुक्रवारी ही सराफा बाजार आणि वायदे बाजारात भाव घसरणीवर आहे. त्याचा खरेदीदार, गुंतवणूकदारांन फायदा झाला.

Gold Price Update News : शुक्रवारी पण सोन्यात पडझड, 10 ग्रॅम झाले इतके स्वस्त!
खरेदीची संधी
| Updated on: Mar 03, 2023 | 9:15 AM
Share

नवी दिल्ली : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी गुड न्यूज आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Silver Price) चढउतार आला. पण भाव सातत्याने घसरणीवरच होते. शुक्रवारी ही सराफा बाजार आणि वायदे बाजारात भाव घसरणीवर आहे. त्याचा खरेदीदार, गुंतवणूकदारांना (Investors) फायदा झाला. आठवड्याच्या सुरुवातीला एक दिवस भावात तेजी दिसून आली. त्यानंतर किंमती कमी झाल्या. गुरुवारी सोने 53 रुपये प्रति 10 ग्रॅमने तर चांदीत 540 रुपये प्रति किलोची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,900 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. लग्नसराईत सोने-चांदीची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

ibjarates.com या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी सकाळी 9 वाजता भाव अद्ययावत झाले नव्हते. गुरुवारी संध्याकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,863 रुपये होता. तर 916 शुद्ध सोने 51,375 रुपये होते. शुद्ध सोन्यासह चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. 750 शुद्ध सोन्याच भाव 42,065 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 585 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याची किंमत 32,810 रुपये होती. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 63,706 रुपयांवर घसरली.

सोन्याने 2 फेब्रुवारी रोजी उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या 2700 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव उतरले आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने 58,470-58882 रुपये या दरम्यान होता. चांदीने 79980 रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या चांदी 16274 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. लग्नसराईत सोने-चांदीची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

गुडरिटर्न्सनुसार,मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,750 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,750 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,750 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,780 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,480 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.