आणखी तीन बँकांना आरबीआयकडून दंड; चेक करा यामध्ये तुमची बँक तर नाहीना?

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने (RBI) आणखी तीन सहकारी बँकाना(Cooperative Banks) दंड केला आहे. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून या तीन बँकांना मिळून एकूण पाच लाखांचा दंड करण्यात आला आहे.

आणखी तीन बँकांना आरबीआयकडून दंड; चेक करा यामध्ये तुमची बँक तर नाहीना?
आरबीआय बँक
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 8:20 AM

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने  (RBI) आणखी तीन सहकारी बँकाना(Cooperative Banks) दंड केला आहे. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून या तीन बँकांना मिळून एकूण पाच लाखांचा दंड करण्यात आला आहे. दंड करण्यात आलेल्या बँकांमध्ये जम्मू काश्मीरमधील बारामूल्ला सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँकेसह तामिळनाडूमधील द बिग कांचीपुरम को- ऑपरेटिव्ह बँक आणि चेन्नई सेंट्रल को- ऑपरेटिव्ह बँक (Chennai Central Co-operative Bank) यांचा समावेश आहे. बँकिंग व्यवहारामध्ये असलेली अनियमितता, तसेच कर्ज वाटपाबाबत आरबीआयने घालून दिलेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणात या तीनही बँकांना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यातील बारामूल्ला सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक आणि द बिग कांचीपुरम को- ऑपरेटिव्ह बँकेला प्रत्येकी दोन लाखांचा तर चेन्नई सेंट्रल को- ऑपरेटिव्ह बँकेला एक लाखंचा दंड ठेठावण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील बँकिंग व्यवहारात अनियमिता आणि आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक बँकांना दंड ठोठवाण्यात आला आहे.

दंडाची रक्कम भरण्याचे निर्देश

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आरबीआयने घालून दिलेल्या कर्ज वापटपाबाबतच्या तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने बारामूल्ला सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक आणि द बिग कांचीपुरम को- ऑपरेटिव्ह बँकेला प्रत्येकी दोन लाखांचा तर चेन्नई सेंट्रल को- ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख असा तीन बँका मिळून एकूण पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम जमा करण्याचे तसेच इथून पुढे आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करण्याचे निर्देश देखील संबंधित बँकांना देण्यात आले आहेत. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे. याचा ग्राहकांच्या व्यवहारांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे देखील आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र इंडिपेंडंस को- ऑपरेटिव्ह’चे लायन्सस रद्द

या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयकडून महाराष्ट्र इंडिपेंडंस को- ऑपरेटिव्ह बँकेचे लायन्सस रद्द करण्यात आले आहे. आरबीआयने संबंधित बँकेचे लायन्सस तीन फेब्रुवारी 2022 रोजी रद्द केले. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने आरबीआने या बँकेवर निर्बंध घातले होते. सहा महिने या बँकेला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे निर्देश आरबीआयकडून देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यानंतर देखील बँकेची स्थिती न सुधारल्याने अखेर या बँकेचे लायन्सस रद्द करण्यात आले.

संबंधित बातम्या

शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताय ? फायदे अन् तोटे माहिती करून घ्यायला हवं! आधी जाणून घ्या मग खुशाल वापर करा…

Maha-Infra Conclave: हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; ‘टीव्ही9 मराठीची आज कॉनक्लेव्ह’

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.