Ambani and ED : मोठी बातमी ! उद्योगपती अनिल अंबांनी यांच्यानंतर टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी; काय आहे प्रकरण?

रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांची चौकशी केल्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. मुंबईतीली ईडीच्या कार्यालयात टीना अंबानी यांची कसून चौकशी सुरू आहे.

Ambani and ED : मोठी बातमी ! उद्योगपती अनिल अंबांनी यांच्यानंतर टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 12:25 PM

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण राजकीय घडामोडींनी तापलेलं असतानाच उद्योग जगतातून एक खळबळजनक बातमी आहे. प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांची चौकशी केल्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. मुंबईतीली ईडीच्या कार्यालयात टीना अंबानी यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे उद्योग जगतात एकच खळबळ उडाली आहे.

रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे चेअरमन अनिल अंबानी हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक नुकसानीत आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना अनेक कंपन्या विकाव्या लागल्या आहेत. हे शुक्लकाष्ठ सुरू असतानाच आता त्यात ईडीचं लफडं त्यांच्या मागे लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

नऊ तास चौकशी

ईडीने सोमवारी अनिल अंबानी यांची 9 तास कसून चौकशी केली. त्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी या ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्या आहेत. टीना अंबानी या सकाळी 10 वाजताच ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहे. विदेशी मुद्रेशी संबंधित कायद्याचं कथित उल्लंघन केल्या प्रकरणी अनिल आणि टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. अनिल अंबानी यांच्याविरोधात फेमा अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

तब्बल 814 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचं हे प्रकरण आहे. दोन स्विस बँक अकाऊंटच्या माध्यमातून ही हेराफेरी सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणात याच वर्षी अंबानी कुटुंबाला उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता.

गेल्यावर्षी आयकर विभागाने दोन स्विस बँक अकाऊटमधील 814 कोटीच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळवली होती. त्यात 420 कोटी रुपयांच्या कथित कर चोरी प्रकरणाचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणी अनिल अंबानी यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यामुळे अनिल अंबानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने त्यांना या प्रकरणात दिलासाही दिला होता.

दरम्यान, अनिल अंबानी यांची काल ईडीने नऊ तास चौकशी केली होती. ईडीने त्यांना विविध प्रश्न विचारून भांडावून सोडलं होतं. मात्र, त्यांना नेमके कोणते प्रश्न विचारले आणि त्यांनी काय उत्तरे दिली याचा तपशील समजू शकला नाही. अनिल अंबानी यांनी ईडी पुन्हा बोलावणार की नाही याची माहितीही समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचं सस्पेन्स अधिकच वाढलं आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.