आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; खतांवरील सबसीडी वाढणार?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक (Narendra Modi Cabinet) होणार आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये खतांवर मिळणाऱ्या सबसीडीमध्ये (Fertiliser subsidy) वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; खतांवरील सबसीडी वाढणार?
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 2:33 PM

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक (Narendra Modi Cabinet) होणार आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये खतांवर मिळणाऱ्या सबसीडीमध्ये (Fertiliser subsidy) वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर खते आणि खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आले. याचा फटका हा भारतातील फर्टिलायझर कंपन्यांना बसत आहे. देशातील कंपन्यांकडून कच्च्या मालाच्या आयातीमध्ये घट करण्यात आली आहे. खताची आयात घटल्यास देशात तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे खते आणि विविध प्रकारच्या रसायनांवर सबसीडी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. खतावरील सबसीडी वाढवल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांसह खत आणि रसायने निर्माण करणाऱ्या कंपन्यांना देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये खतांच्या सबसीडीमध्ये घट

एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये फर्टिलाइझरच्या विविध प्रकारांवर मिळणाऱ्या सबसीडीमध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. आर्थिक वर्ष 2022-23 चालू आर्थिक वर्षासाठी युरियावर मिळणाऱ्या सबसीडीसाठी 63 हजार 222 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या सबसीडीची तुलना मागील आर्थिक वर्ष 2021- 2022 सोबत केल्यास सबसीडीमध्ये तब्बल 17 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. मात्र यंदा रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात खतांचा तुटवडा जाणवू शकतो, हे लक्षात घेऊन सबसीडीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जावू शकतो.

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम

गेल्या महिना भरापेक्षा अधिक कालावधीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसत असून, आंतरराष्ट्रीय बाजापेठेत अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच कच्च्या तेलापासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर खतांचा पुरवठा देखील बाधित होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये देशात खतांचा पुरवठा अपुरा पडून किमती भडकू नये यासाठी आज केंद्र सरकार सबसीडी वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Petrol-Diesel price : सलग सातव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

CNG rates hike : महागाईचा भडका, पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांची वाढ

Retail Inflation: महागाईचे घाबरवणारे आकडे! किरकोळ बाजारातील महागाई गेल्या 17 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.