Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel price today) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel price today) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर (Crude oil price) देखील स्थिर आहेत. कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल 106 डॉलर इतके आहेत. सलग 19 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, विशेष म्हणजे 11 एप्रिल रोजी कच्च्या तेलाचे दर 97.82 डॉलर प्रति बॅरल इतके होते. त्यामध्ये वाढ होऊन आज दर प्रति बॅरल 106 डॉलरवर पोहोचले आहेत. मात्र तरी देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये लिटर इतके आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. चेन्नाईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 110.85 आणि डिझेल 100.94 रुपये लिटर आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
- पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आजच्या दरानुसार राज्यात देखील इंधनाचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.
- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोल 120.40 रुपये लिटर तर डिझेल 103.73 रुपये लिटर आहे.
- साताऱ्यात पेट्रोल 121.09 रुपये लिटर तर डिझेल 104.20 रुपये प्रति लिटर इतके आहे.
- अहमदनगरमध्ये पेट्रोल 120.40 रुपये लिटर असून डिझेलसाठी 103.10 रुपये मोजावे लागत आहेत
- पुण्यात पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 120.10 आणि 104. 50 इतके आहेत
- औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.40 तर डिझेल 103.10 रुपये प्रति लिटर आहे
- राज्यात सर्वात महाग पेट्रोल हे परभणीमध्ये मिळत असून, परभणी पेट्रोल प्रति लिटर 123.51 तर डिझेल 106.10 रुपये प्रति लिटर आहे.