Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव.

Today Petrol Diesel Price :  पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
आजचे पेट्रोल, डिझेल दर
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 7:45 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात एक्साईज ड्युटीमध्ये (Excise Duty) कपात करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल (Petrol) प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आतंरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र तरी देखील देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. भारताला सध्या रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा केला जात आहे. प्रति बॅरल मागे तीस टक्के सूट मिळत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहेत.

राज्यातील पेट्रोल, डिझेलचे दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

देशाच्या प्रमुख महानगरातील भाव

आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रत लिटर 96.72 रुपये असून, डिझेलचा भाव प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या दराची तुलना करायची झाल्यास भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल मुंबईमध्ये मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

रशियाकडून भारताला सवलत

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. एवढेच नव्हे तर रशियाकडून कच्च्या तेलाची आयात देखील बंद केली आहे. मात्र ही आयात बंदी भारताच्या पथ्यावर पडली असून, भारताला सध्या रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होत आहे. भारताला रशियाकडून प्रति बॅरच कच्च्या तेलाच्या एकूण किमती पैकी तीस टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या भारत सरकार रशियाकडून मोठ्याप्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करताना दिसून येत आहे. त्यामुळे देशात सध्या पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.