Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
पेट्रोल, डिझेल दर Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 9:02 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर (Diesel Rate) स्थिर आहेत. 22 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर मागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असताना दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल करात कपात करून, पेट्रोलियम कंपन्यांना काही अंशी दिलासा देण्याचे काम केले आहे.

प्रमुख महानगरातील इंधनाचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 89.62 इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना केल्यास सर्वत स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये आहे. तर व्हॅटमध्ये कपात करून देखील सर्वात महाग पेट्रोल, डिझेल मुंबईमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या प्रमुख शहारीतल दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

विंडफॉल करात कपात

पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल करात कपात करून केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि विमान इंधनावर प्रति लिटर सहा रुपये इतका विंडफॉल कर आकारण्यात येत होता. तर डिझेलवर तेरा रुपये इतका विंडफॉल कर आकारण्यात येत होता. पेट्रोलवरील विंडफॉल कर पूर्णपणे मागे घेण्यात आला आहे, तर डिझेलवरील विंडफॉल कर दोन रुपयांनी कमी करण्यात आला आहे.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.