AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol,Diesel Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 07, 2022 | 10:12 AM
Share

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. तब्बल गेल्या 75 दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे रोजी शेवटचे इंधनाच्या दरात बदल झाले होते. 21 मेला केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे 22 मे रोजी पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्राबाबत बोलयचे झाल्यास राज्यात नवे सरकार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवर आकाण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातही पेट्रोल, डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले. मात्र अद्यापही इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचे भाव अधिक आहेत.

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांनी आज जारी केलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा भाव प्रति लिटर 89.62 रुपये लिटर एवढा आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये आहे, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा रेट प्रति लिटर 92.76 इतका आहे. देशाच्या प्रमुख महानगरातील भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये मिळत आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी केले जातात पेट्रोल,डिझेलचे भाव

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या भावावर अवलंबून असात. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमती कमी झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर देखील कमी होता. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज पेट्रोल डिझेलचे दर जारी करण्यात येतातय. मात्र भारतात जवळपास अडीच महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.