Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
Today Petrol, Diesel Rates पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील दर
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात (Petrol, Diesel Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून देशात पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 22 मे ला पेट्रोलचे दर साडेनऊ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर सहा रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरू असताना देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजी , एलपीजीच्या दरात मात्र वाढ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
देशाच्या प्रमुख महानगरातील दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 तर डिझेलचा दर प्रति लिट 94.28 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचा प्रति लिटर दर अनुक्रमे 106.03 आणि 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास पेट्रोल, डिझेलचा सर्वाधिक भाव हा मुंबईमध्ये आहे, तर सर्वाधिक स्वस्त पेट्रोल, डिझेल दिल्लीमध्ये आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 106.35 | 94.28 |
पुणे | 106.10 | 92.58 |
नाशिक | 106.22 | 92.70 |
नागपूर | 106.65 | 93.14 |
कोल्हापूर | 106.02 | 92.54 |
दररोज जारी होतात नवे दर
पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. जर आतंरराष्ट्रीय बाजारत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर दर वाढतात. त्यामुळे दररोज सकाळी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले जातात.