Today petrol, diesel rates : राज्यात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार! पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Petrol Diesel rate) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. आज सलग 45 व्या दिवशी पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटचा बदल झाला होता. 21 मे रोजी केंद्राकडून पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार सुरू असताना देखील भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतात पेट्रलो, डिझेलचे दर स्थिर ठेवण्याच्या धोरणामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फटका बसत असून, परिणामी कंपन्यांनी पेट्रोलपंपाचा पुरवठा कमी केला आहे. कच्च्या तेलामधील चढ-उतार अशीच सुरू राहिल्या भविष्यात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
देशाच्या प्रमुख शहरातील भाव
आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. प्रमुख महानगरांची तुलना केल्यास सर्वाधिक स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये मिळत असून, सर्वात महाग पेट्रोल, डिझेल मुंबईमध्ये आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता
महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी चार जुलैरोजी पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी व्हॅट कपातीचे अश्वासन दिले आहे. येत्या कॅबिनेटमध्ये व्हॅट कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर राज्यात पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात झाल्यास इंधनाचे दर स्वस्त होऊ शकतात. मात्र व्हॅटमध्ये नेमकी किती कपात करण्यात येणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.