Today petrol, diesel rates: पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होणार?, जाणून घ्या आजचे इंधनाचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. भावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेलचे भाव प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर (Petrol price in Delhi) प्रति लिटर 96.72 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol price in Mumbai) प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 102.63 आणि 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपेय इतका आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.92 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
पेट्रोल, डिझेलचे दर आणखी स्वस्त होणार?
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली आहे. पहिल्यांदा चार नोव्हेंबर 2021 ला करामध्ये कपात करण्यात आली होती. तर दुसऱ्यांदा गेल्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. करात कपात केल्यामुळे पेट्रोल प्रति लिटर मागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले. मात्र पुढील काळात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त कच्च्या तेलाची आयात दुपटीने वाढवण्याच्या विचारात आहे. युक्रेन, रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि काही युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. रशियातील कच्च्या तेलाच्या आयातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सध्या रशियाकडे मुबलक प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा आहे. हे कच्चे तेल सवलतीच्या दरात भारताला देण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. यापूर्वी देखील भारताने रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी केले आहे. कच्चा तेलाची आयात वाढवल्यास पुढील काळात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होऊ शकते.