Today Petrol, Diesel Rates : पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या इंधनाचे आजचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol, Diesel Rates : पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या इंधनाचे आजचे दर
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 8:30 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर 22 मे पासून स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 22 मेला पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून राज्यात पेट्रोल,डिझेलचे दर स्थिर आहेत. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरूच आहे. मात्र दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किमती देशात स्थिर असल्यामुळे याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. त्यांच्या मार्जीनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलपंपाना करण्यात येणारा इंधनाचा पुरवठा कमी केला आहे. दरम्यान दुसरीकडे सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढीचा निर्णय घेतल्याने येत्या काळात पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

देशाच्या प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. महानगरातील इंधनाच्या दराची तुलना करायची झाल्यास अद्यापही सर्वात महाग पेट्रोल हे मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त पेट्रोल दिल्लीमध्ये मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

राज्यात नवे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपातीची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राकडून एक्साईज ड्यूटी कमी करण्यात आल्यानंतर राज्यात देखील व्हॅट कपात करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर नवे सरकार सत्तेत येताच पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.