Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Today petrol, diesel rates) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही पेट्रोल (petrol), डिझेलचे (diesel) दर स्थिर आहेत.

Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर
पेट्रोल, डिझेलचे दर Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 7:19 AM

मुंबई : देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Today petrol, diesel rates) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही पेट्रोल (petrol), डिझेलचे (diesel) दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहण्याचा आज सलग तेरावा दिवस आहे. इंधनाच्या दरात शेवटची भाववाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. दिनांक 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात इंधनाच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली. याकाळात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर दहा रुपयांपेक्षा अधिक महागले. मात्र त्यानंतर इंधनाच्या दरात कोणताही बदल झाल नसल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आजच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105 रुपये तर मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर अनुक्रमे 120 आणि 104 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 110 रुपये लिटर आहे. तर कोलकाता मध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 115 रुपये मोजावे लागत आहेत.

प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 लिटर आहे. पुण्यात 120.51 रुपये तर डिझेल 104.77 लिटर आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये असून, परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.53 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 106.10 रुपये प्रति लिटर इतका आहे.

निवडणुकांच्या निकालानंतर भाववाढ

चार नोव्हेंबर 2021 रोजी केंद्राने इंधनावरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने, पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल 137 दिवस इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यानंतर पाचा राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर 22 मार्चपासून पुन्हा एकदा इंधन दरवाढीला सुरुवात झाली. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात इंधनात लिटरमागे तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. मात्र सहा एप्रिलनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.सहा एप्रिलपासून ते आजपर्यंत दरात कोणताही बदल करण्यात आलेला नही.

संबंधित बातम्या

Bank opening time : आजपासून बँकेच्या वेळेमध्ये बदल, सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका

Campus Activewear : ‘ही’ फुटवेअर बनवणारी कंपनी पुढील महिन्यात आणणार आपला IPO

74 वेळा नकार देऊनही नाही मानली हार… जाणून घ्या, देशातील या पहिल्या युनिकॉर्न जोडप्याची अनोखी कहाणी सारांश

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.