Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरूच आहे. आज कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 120 डॉलरवर पोहोचले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आजचे भाव
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात (Excise Duty) कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचा आजचा भाव 120 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तरी देखील भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या रशियाकडून आपण आयात करत असलेल्या कच्च्या तेलावर तीस टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या दराची तुलना करायची झाल्यास आज सर्वात महाग पेट्रोल हे मुंबईमध्ये मिळत आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल हे दिल्लीमध्ये आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
मे महिन्यात 2.5 कोटी बॅरल कच्च्या तेलाची आयात
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि काही युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात देखील बंद केली आहे. याचा परिणाम म्हणजे भारताला रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल मिळत आहे, प्रति बॅरलमागे तीस टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या रशियाकडून मोठ्याप्रमाणात कच्च्या तेलाची आयात सुरू असून, मे महिन्यात भारताने रशियाकडून सुमारे 2.5 कोटी बॅरल कच्च्या तेलाची आयात केली.