Today petrol, diesel rates : कच्च्या तेलाच्या दरात तेजी; पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात राज्यातील पेट्रोल, डिझेलचे भाव.

Today petrol, diesel rates : कच्च्या तेलाच्या दरात तेजी; पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
पेट्रोल-डिझेलचे दर
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 7:37 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर असून, भावात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude oil price) दरात चढ-उतार सुरूच आहे. आज कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 122 डॉलरवर पोहोचले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांद दास (Shaktikanta Das) यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलात आलेल्या तेजीमुळे भविष्यात पेट्रोल, डिझेलचे भाव आणखी वाढू शकतात. इंधनाचे वाढते दर हेच महागाईला कारणभूत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यास महागाई आणखी एक टक्क्यांनी वाढून, 6.7 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयच्या वतीने काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 92.76 रुपये एवढा आहे.

हे सुद्धा वाचा

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.