AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today’s gold, silver prices : सोन्याच्या भावात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

Today's gold, silver prices : सोन्याच्या भावात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील दर
आजचे सोन्याचे दर Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 27, 2022 | 12:34 PM
Share

मुंबई : आज सोने (Gold), चांदीच्या (silver) दरात तेजी दिसून येत आहे. सोन्यासह चांदीचे भाव वधारलेत. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. गुरुवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,650 इतका होता. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,980 रुपये इतका होता. आज 22 व 24 कॅरट सोन्याच्या दरात अनुक्रमे प्रति तोळा 100 आणि 110 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे आज चांदीच्या भावात (silver prices) देखील वाढ पहायला मिळत आहे. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो 61,500 रुपये इतका होता तर आज चांदीचा दर प्रति किलो 62,150 रुपयांवर पोहोचला आहे. आज चांदीचे दर किलो मागे 650 रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात, त्यामुळे सोन्याच्या दरात शहरानुसार तफावत आढळून येते. सकाळी सराफा बाजार सुरू होताच सोन्याचे दर जाहीर केले जातात. तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी सोन्याचे दर जाहीर केले जातात.

प्रमुख महानगरातील सोन्याचे दर

आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्यााच दर प्रति तोळा 47,750 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,150 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये तर 24 कॅरट सोन्याच दर 52,090 रुपये इतका आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,780 तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,120 रुपये इतका आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

  1. आज सोने आणि चांदीच्या दरात तेजी आली असून, मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे.
  2. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,850 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,190 रुपये इतका आहे.
  3. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,850 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,190 रुपये इतका आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,850 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,190 रुपये इतका आहे.
  5. आज चांदीचा दर प्रति किलो 62,150 रुपये एवढा आहे.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.