Gold Silver Price : दसऱ्यापूर्वीच सोन्याला लकाकी, तर चांदीचे दरही चमकले

Gold Silver Price : सोन्याच्या चांदीच्या दरात दसऱ्यापूर्वी मोठी वाढ दिसून आली. .

Gold Silver Price : दसऱ्यापूर्वीच सोन्याला लकाकी, तर चांदीचे दरही चमकले
सोने-चांदीचे दर वधरलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 6:48 PM

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) दसऱ्याच्या (Dasara) मुहूर्तावर वाढ झाली आहे. दसऱ्याला आता अवघा काही कालावधी उरला आहे. देशातील सराफा बाजारात सोने-चांदी मजबूत झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार (HDFC Securities), मंगळवारी सोने 980 रुपये मजबूत होऊन प्रति 10 ग्रॅमसाठी 51,718 रुपये किंमतीवर विक्री सुरु आहे.

यापूर्वीच्या व्यापारी सत्रात प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचे दर 50,738 रुपये होते. मंगळवारी चांदीच्या किंमतीही वधरल्या आहेत. चांदीच्या किंमतीत 3,790 रुपयांची दरवाढ दिसून आली. त्यामुळे मंगळवारी चांदीची किंमत 61,997 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढले. सोने 1,710 अमेरिकी डॉलर प्रति औसवर व्यापार करत होते. तर चांदी 20.99 डॉलर प्रति औसवर होती. मार्च महिन्यानंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोन्याच्या किंमती या महिन्यात वधरल्याचा दावा एचडीएफसी सिक्युरिटीजने केला आहे.

हे सुद्धा वाचा

इंडियन बुलियन अॅड ज्वैलर्स असोसिएशन नुसार, किरकोळ बाजारात सोमवारी शुद्ध सोन्याच्या किंमतीत गेल्या दोन महिन्यांत 1,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीच्या किंमतीत आठवड्यात 2,000 रुपये प्रति किलोग्राम वाढ झाली.

दरम्यान केंद्र सरकारने आयातीवर नियंत्रणासाठी महागड्या प्लॅटेनियमवर सीमा शुल्क वाढवले आहे. सीमा शुल्कामध्ये 10.75 टक्क्यांची वाढ केली. आता शुल्क 15.4 टक्के झाले आहे. अर्थमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, हे नवीन आयात शुल्क 3 ऑक्टोबर 2022 रोजीपासून लागू करण्यात आले आहे.

दरम्यान मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारी सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 31 पैशांनी मजबूत झाला. आज रुपया 81.51 स्तरावर पोहचला. सोमवारी रुपयात 42 पैशांची घसरण दिसून आली होती.  दरम्यान सणाच्या तोंडावर भाववाढ झाल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर परिणाम दिसून येईल असे नाही. कारण सणाच्या मुहूर्तावर भारतीय सोने-चांदी खरेदी करतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.