Today’s petrol, diesel rates : आजही इंधनाचे दर स्थिर; जाणून घ्या देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या इंधनाच्या नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आली नसून भाव स्थिर आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात येतात. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधीमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाच्या दरामध्ये शेवटचा बदल गेल्या महिन्यात सहा एप्रिल रोजी करण्यात आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटरमागे तब्बल दहा रुपयांपेक्षाही अधिक महाग झाले. मात्र त्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरू असताना देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Rate) प्रति लिटर 105.41 रुपये आहे. तर डिझेलचा दर (Diesel Rate) प्रति लिटर 96.67 रुपये लिटर आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून डिझेल प्रति लिटर 105.41 रुपये आहे.
देशाच्या प्रमुख शहरातील दर
आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून डिझेल प्रति लिटर 105.41 रुपये आहे. चेन्नईमधे पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.85 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 100.94 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 115.12 तर डिझेलचा भाव 99.83 रुपये प्रति लीटर आहे.
केंद्राकडून राज्यांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन
भारतात केल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र तरी देखील सध्या पेट्रोल, डिझेलच्या किमती सर्वोच्च पातळीवर आहेत. भाववाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करणार का असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित करण्यात येत होता. मात्र यावर उत्तर देताना पेट्रोलियम मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले की, केंद्राने यापूर्वीच कर कमी केला आहे. आता वेळी आहे ती राज्यांनी इंधनावरील कर कमी करण्याची, राज्या सरकारने इंधनावरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करणयात आले आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील आजचा दर
आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये लिटर असून डिझेल प्रति लिटर 105.41 रुपये आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 रुपये असून डिझेलचा दर 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.40 तर डिझेलचा दर 103.73 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 121.30 व 104. 50 रुपये प्रति लिटर आहे.