Tomato Price : शेतकरी राजाला पहिल्यांदाच घामाचे दाम! Tomato ने केले मालामाल

Tomato Price : टोमॅटोच्या किंमती आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांनी टोमॅटोचा उपवास धरला आहे. यापूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्यात यायचा. पण आता टोमॅटोने अनेक शेतकऱ्यांना मालामाल केले आहे. ते कोट्याधीश झाले आहेत.

Tomato Price : शेतकरी राजाला पहिल्यांदाच घामाचे दाम! Tomato ने केले मालामाल
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 10:22 AM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) वधारल्याने सर्वसामान्यांना उपवास घडत आहे. केंद्र सरकारची स्वस्ता टोमॅटोची योजना पण सर्वसामान्यांनासाठी महागच ठरत आहे. 30 रुपये किलोंनी यापूर्वी टोमॅटोची विक्री होत होती. सरकार 90 किलो रुपयांनी टोमॅटो उपलब्ध करुन देत आहे. सर्वसामान्य बेजार असला तरी यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) लॉटरी लागली आहे. भाव मिळत नसल्याने अनेकदा टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्यात आले. त्याच टोमॅटोने शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणले आहेत. पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक शेतकरी लखपतीच नाही तर करोडपती (Crorepati) झाले आहेत. एकाच महिन्यात हा करिष्मा घडला. शेतकऱ्यांना अचानक लॉटरी लागली आहे. शेतकरी मालामाल झाले आहेत.

30 रुपयांहून थेट 300 रुपयांची झेप

20-30 रुपये किलो भाव असलेले टोमॅटो आता 350-400 रुपये किलोवर पोहचले आहेत. सर्वसामान्यांना या महागाईने जेरीस आणले असले तरी शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. शेतकरी लखपतीच नाहीतर करोडपती झाले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. एकाच महिन्यात त्यांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आले आहेत.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकातील शेतकऱ्याने कमावले 38 लाख

कर्नाटकमधील कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाला टोमॅटोने लॉटरी लावली. हा शेतकरी अवघ्या 30 दिवसांत मालामाल झाला. शेतकऱ्याने एका आठवड्यात टोमॅटोच्या 2000 बॉक्स विकले. त्यातून त्याला कमाई झाली. महिनाभरात त्याने 38 लाख रुपये कमावले. व्यापारी थेट बांधावर जाऊन टोमॅटो खरेदी करत आहेत. तर काही ठिकाणी कृषी बाजार समितीत मोठं-मोठ्या बोली लागत आहेत. शेतकरी मालामाल होत आहेत.

नारायणगंजच्या शेतकऱ्याला 18 लाखांची लॉटरी

नारायणगंज येथील एका शेतकऱ्याला टोमॅटो विक्रीतून 18 लाखांची लॉटरी लागली. या शेतकऱ्याने एकूण 900 क्रेट टोमॅटोची विक्री केली. त्यातून तो लखपती झाला. त्याने एक क्रेट 2100 रुपयांना विक्री केला. त्याची एका दिवसातच 18 लाख रुपये कमाई केली. महिन्याभरातच या शेतकऱ्याला दरवाढ मिळाली. एकाच महिन्यात भाव 1000 रुपयांहून थेट 2400 रुपये प्रति क्रेटवर पोहचला.

पुण्यातील शेतकऱ्याला 2.8 कोटी रुपये

उत्तर भारताला पावसाचा फटका बसल्याने पिकांवर संकट आले आहे. टोमॅटोच्या महागाईने किंमती वाढल्या आहेत. तर काही ठिकणी शेतकऱ्यांना या वाढीव किंमतींचा फायदा होत आहे. शेतकरी लखपतीच नाही तर करोडपती झाले आहेत. पुण्यातील एका शेतकऱ्याला टोमॅटो विक्रीतून 2.8 कोटी रुपयांची कमाई करता आली. या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणात टोमॅटो आहेत. त्यातून त्याला कमाईचा आकडा 3.5 कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

करोडपती शेतकरी

जून्नरमध्ये अनेक कुटुंब करोडपती झाले आहेत. तालुक्यातील 10 ते 12 शेतकरी टोमॅटोमुळे मालदार झाले आहेत. या तालुक्यातील काही शेतकरी लखपती झाले आहेत. बाजार समितीने एका महिन्यात 80 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.