आधार, यूएएन लिंकिंगचा उद्या शेवटचा दिवस; …तर मिळणार नाही पीएफ

ज्यांनी अद्यापही यूएएनला आधार लिंक केले नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबर हा आधार लिंकिंगचा शेवटचा दिवस आहे. 30 नोव्हेंबर नंतरही जर आधार आणि यूएएन लिंक नसेल तर संबंधित व्यक्तीच्या खात्यात पीएफ जमा होणार नाही.

आधार, यूएएन लिंकिंगचा उद्या शेवटचा दिवस; ...तर मिळणार नाही पीएफ
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 11:11 AM

नवी दिल्ली: ज्यांनी अद्यापही यूएएनला आधार लिंक केले नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबर हा आधार लिंकिंगचा शेवटचा दिवस आहे. 30 नोव्हेंबर नंतरही जर आधार आणि यूएएन लिंक नसेल तर संबंधित व्यक्तीच्या खात्यात पीएफ जमा होणार नाही. पीएफ सुविधेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओकडून यूएएन आणि आधार लिंकिंग सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड यूएएनला लिंक केल्याने अनेक गैर प्रकाराला आळा घातला जाऊ शकतो, असे ईपीएफओच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आधार लिंकिंगला मिळाली होती मुदतवाढ 

ईपीएफओकडून पीएफसाठी यूएएन नंबरला आधार  कार्ड लिंक करण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पीएफ जमा करण्यात येणार नाही, असे ईपीएफओकडून सांगण्यात आले होते. दरम्यान यूएएन आधार लिंकिंगसाठी यापूर्वीच मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याची मुदत वाढवून एक डिसेंबर 2021 करण्यात आली होती. आता मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा नसल्याने, तुम्हाला येत्या दोन दिवसांमध्ये यूएएनला आधार लिंक करावे लागेल, अन्यथा तुमचा पीएफ खात्यात जमा होणार नाही.

….तर विमाही मिळणार नाही

जर आधार कार्ड यूएएनला लिंक नसेल तर तुमचे आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते, एप्लॉईज डिपॉझिट लिंक्ड विम्यासाठी देखील ईपीएफओकडून आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर विम्याचा हप्ता देखील रोखण्यात येईल, आणि तुम्हाला विम्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी यूएएनला आधार कार्ड लिंक करावे असे आवाहन ईपीएफओच्या वतीने करण्यात आले आहे. या कामासाठी ईपीएफओच्या वतीने अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

Sovereign Gold Bond Scheme :आजपासून प्रति 10 ग्रॅम 500 रुपये स्वस्त सोने खरेदीची संधी

एक डिसेंबरपूर्वी पटापट उरका ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

बँकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘आरबीआय’चा महत्त्वपूर्ण निर्णय; …तर होणार कारवाई

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.