AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC ची खास ऑफर! 12 दिवसांत करा 4 धाम यात्रा, वाचा किती येणार खर्च?

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे 'हिमालयीन चार धाम यात्रा -2021'. या पॅकेज अंतर्गत आपण केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम पाहण्यास सक्षम असाल.

IRCTC ची खास ऑफर! 12 दिवसांत करा 4 धाम यात्रा, वाचा किती येणार खर्च?
फी सबमिट केल्यानंतर तुमच्या IRCTC खात्याशी संबंधित सर्व माहिती मेल केली जाईल. तुम्ही आता अधिकृत तिकीट बुकिंग एजंट म्हणून तुमच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन तिकिटे बुक करू शकता. कागदपत्रे म्हणून तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, वैध ईमेल आयडी, फोटो, कार्यालयीन पत्त्याचा पुरावा, घराचा पत्ता, घोषणापत्र आणि नोंदणी फॉर्म आवश्यक असेल.
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 8:11 AM

नवी दिल्ली : आयआरसीटीसीने (IRCTC) प्रवाश्यांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफरमध्ये तुम्हालाचार धाम फिरण्यासाठी जाता येणार आहे. खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला फक्त 40,100 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये 11 रात्री आणि 12 दिवसांचा प्रवास देण्यात येईल. यासह या प्रवासात तुम्हाला गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ दाखवले जाईल. याशिवाय तुम्हाला फक्त 2 धामचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला, 34,650० रुपये खर्च करावे लागतील. (tour package for chardham yatra price and book online via irctctourism com)

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे ‘हिमालयीन चार धाम यात्रा -2021’. या पॅकेज अंतर्गत आपण केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम पाहण्यास सक्षम असाल.

हरिद्वारकडून किती खर्च येईल?

आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार या पॅकेजचे भाडे प्रति व्यक्ती 43850 रुपये असेल, परंतु तुम्हाला फक्त 2 धामास भेट द्यायची असेल तर ते प्रति व्यक्ती 37800 रुपये आहे. जर तुम्हाला हरिद्वार ते चार धाम असा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी 40,100 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी दोन धामच्या प्रवासासाठी तुम्हाला 34,650 रुपये द्यावे लागतील.

प्रवाश्यांना विशेष व्यवस्था मिळेल

कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर या पॅकेजमधील प्रवाश्यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचेदेखील त्यामध्ये पूर्ण पालन केले जाईल, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता कायम राहील.

या सुविधा असतील उपलब्ध

– या व्यतिरिक्त या पॅकेजमध्ये तुम्हाला जेवणाचीही व्यवस्था मिळेल.

– 3 तारांकित हॉटेलमध्ये तुमच्या मुक्कामासाठी बुकिंग केले जाईल, जेणेकरून तुम्हाला सर्व सुविधा मिळतील.

– चार धाम यात्रेवर एका गटातील केवळ 20 प्रवासी घेतले जात आहेत.

– अधिक माहितीसाठी आपण irctctourism.com वर भेट देऊ शकता.

या नंबरवर करा संपर्क

कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आयआरसीटीसीने दिलेला हेल्पलाइन नंबर 9717641764, 8287930908, 8287930909, 8595930981 आणि 8287930910 येथे संपर्क साधा. (tour package for chardham yatra price and book online via irctctourism com)

संबंधित बातम्या –

Ration Card : रेशनकार्डसाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे डॉक्यूमेंट, तुम्हीही ‘असं’ करा अल्पाय

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे दिलासा, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

Bank Holidays List : 3 दिवसांमध्ये करा बँकेची काम, पुढचे 10 दिवस बँकांना सुट्टी

(tour package for chardham yatra price and book online via irctctourism com)

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.