Toy Sector: खेळणी उद्योगाची गरूड भरारी! आयात 70 टक्क्यांनी घटली तर निर्यातीत 61 टक्क्यांची वाढ
Toy Sector Exports: खेळणी उद्योगात आतापर्यंत आयातीवर निर्भर असणा-या भारताने चित्र पालटले आहे. आता भारत खेळण्याची निर्यात करत आहे. मेक इन इंडियाच्या रुपाने हा भारतीय खेळणी उद्योगाने ही कमाई केली आहे.
पारंपारिक भारतीय खेळण्यांसोबतच जागतिक खेळण्याच्या बाजारात (World Toys Market) आता भारताचा दबदबा वाढला आहे. अवघ्या तीन वर्षांत भारतीय खेळणी उद्योगांनी खेळता खेळता व्यापार वाढवला (Growth in Toys Trade) आहे. चीनचा खेळणी व्यापारात(China Toys Industry) मोठा दबदबा आहे आणि भारतीय बाजारपेठेत स्वस्त चीनी खेळण्यांनी अतिक्रमण वाढवले होते. त्याला तोड देण्यासाठी मेक इन इंडियाच्या (Make In India) माध्यमातून रणनिती आखण्यात आली. खेळणी उद्योगाला पोषक वातावरणासोबतच निधीची उपलब्धता करुन देण्यात आली. त्याचा अनुकूल परिणाम दिसून आला. अवघ्या तीन वर्षांत खेळणी उद्योगाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर आनंदाची लकेर उमेटवली. भारतीय खेळणी उद्योगाने (Indian Toys Market) आंतरराष्ट्रीय बाजारातही अमीट छाप सोडली आहे. भारताची खेळणी निर्यात (Export) आता 61 टक्क्यांनी वाढली आहे, एवढाच हा परिणाम नाही, तर खेळण्याची आयात (Import) 70 टक्क्यांनी घटली आहे. लहान मुलांच्या भावविश्वात भारतीय खेळण्यांनी विश्वास निर्माण केलाच पण पालकांचाही भरवसा जिंकला याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
आयातीत कमालीची घसरण
भारतीय खेळणी उद्योगाने अवघ्या तीन वर्षात जी करामत केली, ती वाखण्याजोगी आहे. खेळणी उद्योगाची पायाभरणी तर कधीचीच झाली होती, पण त्यामध्ये जाण फुकंल्या गेली ती या तीन वर्षात. पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) आकडेवारीनुसार, भारतात 2018-2019 या वर्षात 371 अब्ज डॉलरच्या खेळण्याची आयात करण्यात आली. हा आकडा फार मोठा आहे. त्यासाठी मोठी गंगाजळी वापरल्या गेली हे उघड आहे. परंतू, खेळणी उद्योगाला प्रोत्साहन मिळाल्यानंतर आयातीचा हा आकडा झर झर खाली आला. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आयात घटून 110 अब्ज डॉलरवर येऊन ठेपली. खेळणी उद्योगाने कात टाकल्यामुळे हा सकारात्मक बदल घडून आला. विविध गुणवत्ता आणि दर्जा यावर आधारीत या खेळणी उद्योगात विविध श्रेणीतील आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. स्टॅटर्डनुसार, एचएस कोड 9503,9504 आणि 9503 या खेळण्यांच्या आयातीत विशेष घट दिसून आली.
निर्यातीत हनुमान उडी
भारतीय खेळणी उद्योगामुळे आयात तर कमालीची घटलीच पण त्याला मोठा पर्याय भारतीय उद्योगांनी दिला. भारतीय मोठ्या, लघू, मध्यम आणि कुटीर उद्योगात खेळण्यानी मार्केट गाजवलेच नाहीत मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला. 2018-19 मध्ये भारतीय खेळणी उद्योगाची एकूण उलाढाल आणि निर्यात 202 अब्ज डॉलर होती. त्याला केंद्र सरकारने बुस्टर डोस दिल्यानंतर अवघ्या तीनच वर्षात खेळणी उद्योगांनी भरारी घेतली. 2021-22 मध्ये खेळणी उद्योगाची निर्यात 326 अब्ज डॉलरवर पोहचली. या उद्योगाने 61.39 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. विविध गुणवत्ता आणि दर्जा यावर आधारीत या खेळणी उद्योगात विविध श्रेणीतील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्टॅटर्डनुसार, एचएस कोड 9503,9504 आणि 9503 या खेळण्यांच्या निर्यातीमध्ये विशेष वृद्धी दिसून आली. विशेष म्हणजे या खेळण्यांनी गुणवत्तेशी कुठेही तडजोड केलेली नाही. खेळणी तयार करताना भारतीय मानक ब्यूरो, गुणवत्ता नियंत्रण आदेश आणि जीआई टॅग याचे विशेष लक्ष्य ठेवण्यात येते. त्याच मापदंडावर खेळणी उत्पादन करण्यात येते.